Saturday, October 30, 2021

मराठी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ

 



                    वाक्प्रचार व त्यांचा अर्थ  : -

    1. आभाळ गच्च भरणे - आभाळात पावसाचे ढग भरणे.
    2. खंत करणे- काळजी करणे,विवंचना करणे .
    3. पुटपुटणे – स्वतःशी बोलणे .
    4. दिड़्.मूढ होणे – चकित होणे .
    5. मोहात पाडणे- भुरळ पाडणे.
    6. पक्का निर्धार करणे- ठाम निश्चय करणे.
    7. धक्का बसणे – मनाला हादरा बसणे.
    8. हळहळणे – वाईट वाटणे.
    9. स्वप्नात हरवणे- मनोमन गुंग होणे.
    10. थक्क होणे – आश्चर्यचकित होणे,नवल वाटणे .
    11. वळण लागणे – वर्तनात अनुकूल बदल होणे.
    12. स्वतःच्या पायावर उभे राहणे – स्वावलंबी होणे .
    13. अंतःकरण भरून येणे – सद्गदित होणे.
    14. जाणीव होणे- कळणे,समजणे.
    15. तोंडाला पाणी सुटणे- हाव सुटणे ,मोह पडणे.
    16. माफी मागणे – क्षमा मागणे ,दिलगिरी व्यक्त करणे.
    17. खाली मान घालणे – शरम वाटणे .
    18. संधी हुकणे – मोका निसटणे .
    19. वादावादी होणे – भांडण होणे.
    20. मैदान गाजवणे – खेळात प्राविण्य मिळवणे.
    21. एका पायावर तयार असणे- सदैव तत्पर असणे .
    22. आपला वाटणे- जवळचा वाटणे.
    23. वारे वाहू लागणे – सारखी चर्चा होणे.
    24. हिरमुसणे – उदास होणे,नाराज होणे,निराश होणे.
    25. आनंद गगनात न मावणे- खूप आनंद होणे.
    26. कपाळावर आठ्या पसरणे- खटकणे.
    27. बजावून सांगणे – निक्षून सांगणे .
    28. पाल चुकचुकणे – वाईट गोष्टींचा संकेत मिळणे.
    29. मन खट्टू होणे- वाईट वाटणे,नाराज होणे.
    30. उत्साह ओसंडून वाहणे – खूप आनंद होणे.
    31. पाय मुरगळणे- पाय वाकडा होणे.
    32. अपशकून मानणे – वाईट शंका येणे .
    33. पाठीवर हात ठेवणे – दिलासा देणे .
    34. धमाल करणे- मजा करणे.
    35. पोट धरून हसणे- खूप हसणे .
    36. खळखळून हसणे – मोठ्याने खो खो हसणे.
    37. चलबिचल होणे- मनात अस्वस्थ होणे.
    38. कावराबावरा होणे – भयभीत होणे , गोंधळने .
    39. डोक्यात लख्ख प्रकाश पडणे – पूर्णपणे समजणे.
    40. मत परिवर्तन होणे – विचारात बदल होणे.
    41. ताब्यात घेणे – सर करणे.
    42. माहिती पुरवणे – तपशील देणे .
    43. विस्तार करणे – वाढवणे, विस्तृत करणे.
    44. निरीक्षण करणे – नीट पाहणी करणे .
    45. वास्तव्य करणे – एका जागी राहणे .
    46. दर्शन घेणे – डोळ्यांनी पाहणे .
    47. ऊर अभिमानाने भरून येणे – मनात अभिमान दाटणे.
    48. मुकणे – संधी न मिळणे .
    49. उदरनिर्वाह करणे – पोट भरणे.
    50. श्रीगणेशा होणे – सुरुवात होणे, आरंभ होणे.
    51. चीत करणे – प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकवणे.
    52. पट काढणे – प्रतिस्पर्धी मल्लाची टांग खेचणे .
    53. धडे आत्मसात करणे – कौशल्य मिळवणे .
    54. तमा न बाळगणे – न जुमानणे,पर्वा न करणे.
    55. डोक्याला हात लावून बसणे – हताश होणे.
    56. ध्यानात येणे – लक्षात येणे .
    57. मरण ओढवणे – मृत्यू येणे .
    58. आक्रीत घडणे – वाईट होणे.
    59. उपदेश करणे – शिकवण देणे .
    60. मनासारखे घडणे – हवे ते मिळणे .
    61. वाट्याला येणे – नशिबी येणे .
    62. भोगावे लागणे – सहन करावे लागणे .
    63. बोटे मोडणे – दोष देणे .
    64. टस की मस न होणे – काहीही फरक न पडणे.
    65. प्रथा पडणे – रिवाज असणे,रीत लागू होणे.
    66. बट्ट्याबोळ होणे – फासणे.
    67. बोट ठेवणे – दोष दाखवणे .
    68. फैर झाडणे – सरबत्ती सुरु होणे.
    69. आलबेल असणे – ठाकठीक असणे .
    70. अवसान गोळा होणे – धीर गोळा होणे .
    71. कळवळणे – वेदना होणे.
    72. हात चोळत गप्प बसणे – नाईलाजाने गप्प होणे.
    73.  डावा निघणे – कमी प्रतीचा निघणे.
    74. डावे उजवे मानणे – भेद करणे.
    75. अंतःकरण जड होणे – दुःख होणे.
    76. भ्रमनिरास होणे – विश्वास उडणे.
    77. मन हलके होणे – मनावरील ओझे उतरणे.
    78. पळ काढणे – पळून जाणे.
    79. पोटात गोळा येणे – घाबरणे,धास्तावणे.
    80. शिरोधार्य मानणे – अग्रक्रम देणे.
    81. ताठा कमी करणे – अहंकार कमी करणे.
    82. हात कपाळाला लावणे – हताश होणे.
    83. तोंडात बोट घालणे – आश्चर्य वाटणे.
    84. हैराण करणे – त्रास देणे .
    85. झुंबड उडणे – खूप गर्दी होणे.
    86. मान्यता मिळणे – परवानगी मिळणे.
    87. धाकधूक होणे – भीती वाटणे.
    88. बिघाड होणे – नादुरुस्त होणे.
    89. आवर्जून सांगणे – मुद्दामहून सांगणे .
    90. भर घालणे – आहे त्यात अधिक जोडणे.
    91. मार्गदर्शन करणे – योग्य माहिती देणे.
    92. संकल्प करणे – निश्चय करणे, निर्धार करणे.
    93. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणे – शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करणे.
    94. धन्यवाद देणे  – आभार मानणे.
    95. विचारांचा पगडा असणे – विचारांचा प्रभाव असणे.
    96. बारीक लक्ष असणे – बारकाईने न्याहाळणे .
    97. प्रोत्साहन देणे – उत्तेजन देणे .
    98. आस्था असणे – कळकळ असणे, आवड असणे.
    99. अभिवादन करणे – वंदन करणे.
    100. हातभार लावणे – मदत करणे.
    101. संदेश देणे – बहुमोल विचार देणे ,शिकवण देणे .
    102. स्थापन करणे – निर्माण करणे .
    103. अहोरात्र झटणे – रात्रंदिवस कष्ट करणे.
    104. न डगमगणे – न घाबरणे .
    105. स्थानापन्न होणे – (खुर्चीवर) बसणे.
    106. भूमिका पार पाडणे – दिलेले कार्य व्यवस्थित पार पाडणे.
    107. संपन्न होणे – पार पडणे.
    108. आकाशाला गवसणी घालणे – अश्यक्य गोष्ट प्राप्त करण्यास धडपडणे .
    109. खडकातून पाणी काढणे – कठीण व अशक्य वाटणारी गोष्ट करणे.
    110. डोंगर रचणे – खूप मेहनत करणे.
    111. मनस्ताप सहन करणे – मानसिक त्रास सोसणे.
    112. राखण करणे – रक्षण करणे.
    113. पाठ टेकवणे – आराम करणे , झोपणे.
    114. सोन्याचे दिवस येणे – समृद्धी येणे .
    115. मनाला वेडावून टाकणे – मन मोहून टाकणे .
    116. निरुपाय होणे – उपाय नसणे,इलाज न चालणे .
    117. टिपून मारणे – नेम धरून मारणे.
    118. समीकरण मांडणे – सूत्रबद्ध रचना करणे.
    119. वारसा लाभणे – परंपरागत अधिकार मिळणे.
    120. शोध घेणे – मागोवा घेणे .
    121. प्रेरणा घेणे – स्फूर्ती घेणे .
    122. दाद देणे – वाहवा करणे.
    123. मान देणे – आदर दाखवणे .
    124. पाचारण करणे – बोलावणे .
    125. प्रकट करणे – उघड करणे.
    126. मोहोर उमटणे – ठसा उमटणे .
    127. टुमणे लावणे – सतत मागणी करणे.
    128. कान भरणे – उलट-सुलट सांगणे.
    129. दोन हात करणे – सामना करणे ,लढाई करणे.
    130. प्राणाचे मोल देणे – प्राण गमावणे.
    131. पाठ दाखवणे – पळून जाणे.
    132. अचूक वेध घेणे – न चुकता नेम साधणे.
    133. प्रतिकार करणे – विरोध करणे.
    134. प्राणाची पर्वा न करणे – मरणाची भीती न बाळगणे.
    135. उड्डाण करणे – झेप घेणे .
    136. निर्दालन करणे – समूळ नाश करणे .
    137. प्रदान करणे – सन्मानाने बहाल करणे/ देणे.
    138. प्राणाची आहुती देणे – प्राणाचे बलिदान करणे.
    139. वंदन करणे – नमस्कार करणे.
    140. सेवा बजावणे – सेवा करण्याचे कर्तव्य पार पाडणे .
    141. परिधान करणे – अंगात घालणे.
    142. मन उल्लसित करणे – मन प्रसन्न करणे.
    143. झुंबड उडणे- खूप गर्दी होणे.
    144. थाप पडणे- पाठिंबा मिळणे.
    145. आठवणींना उजाळा देणे – पुन्हा स्मरण होणे.
    146. अंथरूण धरणे- आजारात अंथरुणाला खिळून राहणे.
    147. जीव तीळ तीळ तुटणे – खूप काळजी वाटणे.
    148. बलिदान देणे – प्राण समर्पित करणे.
    149. अंतरंगाचा ठाव घेणे – मनात खोलवर जाणवणे.
    150. ढसाढसा रडणे – ओक्साबोक्शी जोराने रडणे.
    151. डोळ्यांतले पाणी न हटणे – सतत अश्रू वाहत राहणे.
    152. जीव घाबराघुबरा होणे – खूप भीती वाटणे.
    153. मन सैरभैर होणे – मनात बेचैनी दाटणे.
    154. मन हेलावणे – मन गलबलणे.
    155. कुशीत घेणे – पोटाशी घेणे,माया करणे.
    156. लाड करणे – कौतुक करणे.
    157. विचारांचे काहूर माजणे – विचारांनी मन घेरणे.
    158. विपरीत घडणे – वाईट घडणे.
    159. कानोसा घेणे – अंदाज घेणे , मागोवा घेणे .
    160. मन आतुरणे – मन उत्सुक होणे .
    161. पुळका येणे – बाजू घेणे .
    162. भरती होणे – दाखल होणे .
    163. हात पसरणे – मदत मागणे .
    164. हायसे वाटणे – समाधान वाटणे .
    165. ध्यान देणे – लक्ष देणे .
    166. विचारात गढणे – खूप विचारात बुडणे.
    167. हरखून जाणे – आनंदी होणे .
    168. भान हरपणे – जाणीव न उरणे .
    169. हट्ट करणे – आग्रह धरणे.
    170. उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे .
    171. प्रभाव असणे – ठसा असणे.
    172. सामील होणे – सहभागी होणे.
    173. आढेवेढे घेणे – अनिच्छा व्यक्त करणे.
    174. त्याग करणे – सोडून देणे .
    175. रखडत चालणे – अडखळत चालणे .
    176. दुखापत होणे – इजा होणे.
    177. धडा शिकणे – अद्दल घडणे , समज येणे.
    178. हातभार लावणे – मदत करणे.
    179. धूम ठोकणे – पळून जाणे .
    180. दम लागणे – धाप लागणे .
    181. कटकट वाटणे – त्रास वाटणे .
    182. बचत करणे – भविष्यासाठी संग्रह करणे.
    183. वणवण करणे – उन्हात पायपीट करणे , भटकणे .
    184. नष्ट होणे – नाहीसे होणे .
    185. खालावत जाणे – कमी होत जाणे.
    186. वाया न घालवणे – फुकट जाऊ न देणे .
    187. अपव्यय टाळणे – दुरुपयोग न करणे .
    188. रूढ होणे – कायम होणे.
    189. तुटवडा असणे – कमतरता असणे .
    190. पटाईत असणे – तरबेज असणे.
    191. शपथ घेणे – प्रतिज्ञा करणे.
    192. बेधुंद होणे – बेभान होणे.
    193. धरतीवर कोसळणे – मरण पावणे .
    194. दुःख गिळणे – दुःख पचवणे.
    195. कथा लावणे – प्रवचन करणे.
    196. आसमंतात घुमणे – अवकाशात नाद फिरत राहणे .
    197. दणाणून सोडणे – सतत आवाज होत राहणे .
    198. रिंगण धरणे – फेर धरणे .
    199. आभाळाकडे डोळे लावून बसणे – पावसाची आतुरतेने वाट पाहणे .
    200. आभाळाची कुऱ्हाड पडणे – मोठे संकट येणे.
    201. काळीज दगडाचे होणे – मन घट्ट करणे.
    202. ओस पडणे – भकास होणे, उजाड होणे.
    203. जीव वरखाली होणे – काळजी वाटणे.
    204. अप्रूप वाटणे – कौतुक वाटणे .
    205. विचारपूस करणे – चौकशी करणे.
    206. थैमान घालणे – उच्छाद मांडणे.
    207. हलकल्लोळ उडणे – हाहाकार माजणे .
    208. युद्धापातळीवर हालचाली करणे – ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे.
    209. हेळसांड करणे – दुर्लक्ष करणे.
    210. वाईट दिवस येणे – हलाखीची परिस्थिती निर्माण होणे.
    211. उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे.
    212. सुळावर चढवणे – फासावर लटकावणे .
    213. कडेलोट करणे – उंच कड्यावरून ढकलून देणे.
    214. हसून हसून पोट दुखणे – खूप हसू येणे, बेफाम हसणे.
    215. तोंड सुकणे – चेहरा निस्तेज होणे,चेहरा फिका पडणे.
    216. जळून खाक होणे – जळून नाश पावणे.
    217. तहानभूक हरपणे- तहानभूक विसरून गुंग होणे.
    218. फसगत होणे- फसवणूक होणे.
    219. ऐटी मिरवणे – तोरा मिरवणे,रुबाब करणे.
    220. तोंडावर हसू फुटणे – पटकन हसू येणे.
    221. वाहवा मांडणे – स्तुती करणे ,कौतुक करणे.
    222. हेवा करणे – मत्सर किंवा द्वेष करणे .
    223. तोंडात बोट घालणे – आश्चर्य वाटणे, नवल वाटणे.
    224. हात बसणे – पक्का सराव होणे ,कुशलता येणे .
    225. उदरनिर्वाह करणे – पोट भरणे.
    226. ध्यान लावणे – डोळे मिटून एकाग्र होणे.
    227. निरुत्तर होणे – उत्तर न सुचणे.
    228. गुजराण करणे – पोट भरणे.
    229. आत्मसात करणे – मिळवणे.
    230. तल्लीन होणे – गुंग होणे,मग्न होणे.
    231. सहभागी होणे – सामील होणे.
    232. गौरव करणे – सन्मान करणे.
    233. व्याकूळ होणे – कासावीस होणे.
    234. ठावठिकाणा नसणे – पत्ता न सापडणे.
    235. हात जोडणे – नम्रपणे विनंती करणे.
    236. प्रसंगावधान राखणे – तत्परतेने निर्णय घेणे.
    237. निपचित पडणे – हालचाल न होता पडून राहणे.
    238. काळजात धस्स होणे – खूप घाबरणे .
    239. भेदरलेल्या नजरेने पाहणे – घाबरलेल्या नजरेने पाहणे .
    240. हायसे वाटणे – समाधान वाटणे.
    241. डोळे पाणावणे – डोळ्यात अश्रू येणे,रडवेले होणे.
    242. प्रसंगाचे गांभीर्य जाणणे- परिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे.
    243. मार्गी लागणे – नीट व्यवस्थित करणे.
    244. अश्रूला वाट मोकळी करून देणे – मोकळेपणाने रडणे.
    245. कुरवाळणे – अंगावरून प्रेमाने हात फिरवणे.
    246. पाय धरणे- लीन होऊन नमस्कार करणे,क्षमा मागणे.
    247. कंबर धरणे – कंबर दुखणे .
    248. वाट वाकडी करणे – वाट बदलून दुसरीकडे जाणे .
    249. रात्रंदिवस घाम गाळणे – दिवसरात्र खूप कष्ट करणे.
    250. चिटपाखरू नसणे – नीरव शांतता असणे.
    251. झेंडू फुटणे- भीतीमुळे तोंडाला फेस येणे.
    252. धाबे दणाणणे – खूप भीती वाटणे.
    253. जीवात जीव नसणे – खूप घाबरणे.
    254. अंग घामाने थबथबणे – घाबरल्यामुळे घामाघूम होणे.
    255. तोंडावाटे शब्द न फुटणे – खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे.
    256. कालवा उडणे – कोलाहल माजणे,गडबडगोंधळ होणे.
    257. धाप लागणे – खूप पळाल्यामुळे दम लागणे.
    258. दूम नसणे – ठावठिकाणा नसणे ,पत्ता नसणे.
    259. विसर पडणे – विस्मरण होणे .
    260. पोटात खड्डा पडणे – खूप भीती वाटणे .
    261. जिवाचा धडा करणे – धीर एकवटणे .
    262. पाठबळ असणे – आधार असणे .
    263. घास मोडणे – जेवणे .
    264. पोटात घाबरा पडणे – खूप घाबरणे .
    265. पायाखालची जमीन हादरणे – भीतीने सुचेनासे होणे .
    266. नाराज होणे – निराश होणे , वाईट वाटणे ,हिरमुसणे .
    267. सार्थकी लागणे – धन्यता पावणे .
    268. गणती करणे – मोजणी करणे .
    269. प्रफुल्लित होणे – आनंदित होणे .
    270. माग काढणे – वाट काढणे , रस्ता शोधणे .
    271. तत्पर असणे – तयार असणे .
    272. पळ काढणे – पळून जाणे.
    273. दाह होणे – आग होणे ,जळजळणे .
    274. ताव मारणे – खूप खाणे ,खाण्यावर तुटून पडणे.
    275. सुगावा लागणे – मागोवा लागणे , अंदाज लागणे.
    276. दिलासा मिळणे – धीर मिळणे .
    277. कणखर बनणे – काटक बनणे .
    278. ओढाताण होणे – कष्टदायक ,त्रासदायक धावपळ होणे.
    279. गराडा पडणे – घेराव पडणे .
    280. नात्यातील वीण गहिरी असणे – नाते घट्ट असणे .
    281. वणवण सहन करणे – त्रासदायक भटकंती सहन करणे.
    282. समजूत काढणे – गैरसमज दूर करणे .
    283. नाव उंच करणे – कीर्ती संपादन करणे ,मानाचे स्थान मिळवणे .
    284. दबदबा निर्माण करणे – दरारा निर्माण करणे.
    285. हिऱ्याला पैलू पाडणे – तरबेज करणे.
    286. सांभाळ करणे – पालनपोषण करणे.
    287. राब राब राबणे – खूप कष्ट करणे.
    288. परिस्थितीशी झगडणे – वाईट स्थितीचा मुकाबला करणे.
    289. कमीपणा वाटणे – अपमान वाटणे.
    290. खंत वाटणे – खेद वाटणे, वाईट वाटणे.
    291. कसूर न करणे – चूक न करणे,दुर्लक्ष न करणे.
    292. खंड पडणे – मध्येच थांबणे .

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment