शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच - 07
शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच - 07
भारताचा
इतिहास
जयदेवाने कोणते
काव्य लिहिले ?
गीतगोविंद
सिद्धांतशिरोमणी
हा ग्रंथ कोणी लिहिला ?
भास्कराचार्य
मराठी भाषेचा
आद्यकवी म्हणून कोणास ओळखले जाते ?
मुकुंदराज
मुकुंदराजाने
मराठी भाषेतील कोणता अद्यग्रंथ लिहिला ?
विवेकसिंधू
कुतुबमिनारच्या
बांधकामास कोणाच्या काळात सुरुवात झाली ?
कुतुबुद्दीन ऐबक
दिल्लीचा पहिला
सुलतान म्हणून कोण ओळखला जातो ?
अल्तमश
अल्तमशने कोणते
चांदीचे नाणे पाडले ?
टंका
मुहम्मद
तुघलकाने देवगिरीचे नाव काय ठेवले ?
दौलताबाद
कुतुबमिनारचे
काम कोणाच्या काळात पूर्ण झाले ?
फिरोज तुघलक
तुघलक
घराण्यातील शेवटचा सुलतान कोण होता ?
नसिरुद्दीन महमूद
विजयनगरची
राजधानी कोणती होती ?
हंपी
विजयनगरचा पहिला
राजा कोण ?
हरिहर
विजयनगर
राज्याच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार राजा कोण ?
कृष्णदेवराय
बहमनी राज्याचा
पहिला सुलतान कोण ?
हसन गंगू
बहमनी राज्याचा
पहिला सुलतानहसन गंगू याने आपली राजधानी कोठे स्थापन केली ?
गुलबर्गा
गुजराती भाषेचे
आद्यकवी म्हणून कोणाला ओळखले जाते ?
संत नरसी मेहता
संत मीराबाई या
कोणत्या राजघराण्यातील होत्या ?
मेवाडच्या
राजघराण्यातील
हिंदी
साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले ?
सूरसागर
गुरुगोविंदसिंग
हे शिखांचे कितवे गुरु होते ?
१० वे गुरु
मुघल सत्तेचा
संस्थापक कोण ?
बाबर
भारतात प्रथमच
तोफखान्याचा प्रभावी वापर कोणी केला ?
बाबरने
शेरशाहने दिल्ली
येथे कोणत्या घराण्याची सत्ता स्थापन केली ?
सूर घराण्याची
शेरशाहने कोणते
नाणे सुरु केले ?
रुपया
पानिपतची दुसरी
लढाई कोणामध्ये झाली ?
अकबर व हेमू
पानिपतच्या
दुसऱ्या लढाईत कोणाचा विजय झाला ?
अकबर
पानिपतची दुसरी
लढाई कोणत्या साली झाली ?
इ.स. १५५६
अकबराच्या
दरबारात कोणता संगीतसम्राट होता ?
तानसेन
जहांगीरच्या
मृत्यूनंतर कोण बादशहा झाला ?
जहांगीरचा मुलगा
शाहजहान
औरंगजेबाने
शाहजहानला कोणत्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले ?
आग्र्याच्या
आहोमांनी भारतात
कोणत्या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले ?
ब्रम्हपुत्रेच्या
खोऱ्यात
गुरुतेगबहाद्दूर
हे शिखांचे कितवे गुरु होते ?
नववे गुरु
शिखांचे दहावे
गुरु गुरुगोविंदसिंग यांचा इ.स.१७०८ मध्ये कोठे मृत्यू झाला ?
नांदेड येथे
मुर्शिदकुलीखान
याने बंगालची राजधानी कोठे नेली ?
मुर्शिदाबाद
बंदा बैरागीने
कोणाच्या नावे नाणी पडली ?
गुरुनानक व
गुरुगोविंदसिंग
मुघलकालीन
सोन्याच्या नाण्यास काय म्हणत ?
मोहर
मुघल बादशाहांनी
कोणती तांब्याची नाणी पडली ?
दाम
ताजमहाल ही
वास्तू शाहजहानने कोणाच्या स्मरणार्थ बांधली ?
मुमताजमहल
ताजमहाल ही
सौंदर्यपूर्ण वास्तू कोणत्या शहरात आहे ?
आग्रा
शाहजहान याने
दिल्ली येथे बांधलेली कोणती वास्तू प्रसिद्ध आहे ?
लाल किल्ला
संत
ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
ज्ञानेश्वरी (
भावार्थदीपिका)
महाराष्ट्रात
वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला ?
संत ज्ञानेश्वरांनी
कुमारसंभव हे
महाकाव्य कोणी लिहिले ?
कालिदास
चरकसंहिता या
ग्रंथाची रचना कोणी केली ?
चरक
समुद्रगुप्त
कोणाचा भक्त होता ?
विष्णूचा
गुप्त घराण्याचा
संस्थापक कोण होता ?
श्रीगुप्त
पुराणांची एकूण
संख्या किती आहे ?
१८ पुराणे
क्रांतिज्योती
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन
3 जानेवारी
बालिका दिन
नमस्कार
बालमित्रांनो ,
आज 3 जानेवारी
.आपण आजचा दिवस ‘बालिका
दिन’ म्हणून साजरा करतो .आजचा दिवस खूप महत्वाचा आहे .कारण
महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील पहिल्या शिक्षिका ,मुख्याध्यापिका त्याचप्रमाणे मुलींच्या शिक्षणाची ज्योत प्रत्येक
उंबऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वसामान्यांच्या घरातील शिक्षणरुपी पणती
पेटविण्यासाठी धडपडणारी क्रांतीची एक तेजस्वी ज्योत म्हणजेच सावित्रीबाई फुले .आज
त्यांचा जन्मदिवस ...
खंडोजी नेवसे पाटील घराण्यातील
ह्या ज्योतीचा जन्म सातारा येथील नायगाव येथे दि.3 जानेवारी १८३१ रोजी झाला
.त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्यांचा विवाह वयाच्या ९ व्या वर्षी झाला .म्हणजे आज 3
रीत शिकणाऱ्या मुलीचा त्याकाळी विवाह केला जात होता .यावरून तुम्हाला त्यावेळची सामाजिक
परिस्थिती समजून येईल .
सासरच्या घरी
आल्यानंतर ज्योतीरांवांबरोबर त्यांचा बालसंसार सुरु झाला .ज्योतीराव शिक्षण घेत
होते .ज्योतीरावांनी आपली पत्नी सावित्रीला शिकवण्याचा निर्णय घेतला . अडचण होती
ती शाळा ,वर्ग ,शिक्षक
,फळा ,खडू यांची .यातील कोणतीच गोष्ट मात्र
त्यांच्याजवळ नव्हती .मात्र ज्योतीरावांनी ही अडचण लगेच सोडवली .त्यांनी शेतीला
शाळा बनवलं ,झाडाला वर्ग बनवलं ,स्वतःला
शिक्षक बनवलं ,धरतीला फळा बनवलं व गवताच्या काडीला खडू बनवलं
.या निसर्गाच्या शाळेत ज्योतीरावांनी सावित्रीला मुळाक्षरे शिकवली .याच सावित्रीबाई
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व आदर्श मुख्याध्यापिका बनल्या .
सन १८४८ मध्ये
फुले दाम्पत्यांनी भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केली .महात्मा
फुले यांनी सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईनी प्रशिक्षित
शिक्षिका म्हणून कार्य सुरु केले .त्यांच्या शाळेत सुरुवातीला केवळ ६ मुली शिक्षण
घेत होत्या .या सहा विदयार्थीनीपासून त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य सुरु झाले
.त्यावेळी आजच्या सारखा पगार – साधी कवडीसुद्धा मोबदला नव्हता .तरीही त्यांनी हे ज्ञानदानाचे कार्य केले
.
सावित्रीबाईंचे
हे शिक्षणकार्य खरोखरच एक अभ्यासविषय आहे ,कारण त्यांनी ज्या काळात हे कार्य सुरु केले तेव्हा भारतीय
समाजाची स्थिती मागास व दयनीय होती . एकूणच समाज मानसिक रोगांनी ग्रस्त व सामाजिक
व्याधींनी त्रस्त होता .
वर्णवर्चस्व ,अस्पृश्यता ,पुरुषप्रधानता ,अज्ञान ,अंधश्रद्धा
,अनिष्ट रूढी , परंपरा इ.रोगांनी
समाजाला ग्रासले होते .अशा वाईट परिस्थितीमध्ये ज्यांनी ज्ञानज्योत पेटविली ,त्या सावित्रीबाई महान कर्तृत्ववान होत .त्यांनी हे ओळखले होते की . मुक्याला
बोलके करायचे असेल ,गुलामाला गुरगुरायचे तर शिक्षणाशिवाय
पर्याय नाही .शिक्षणामुळे सृजनशीलता वाढते सत्यासत्य ,भलेबुरे
,हित-अहित कळायला लागते . नवी दृष्टी मिळते .
शिक्षणाने गुलामीची जाणीव होते
.माणसाला गुलामीचे जोखड उतरविण्याचे सामर्थ्य सामर्थ्य लाभते .
१६ नोव्हेंबर १८५३ रोजी इंग्रज सरकारने
त्यांचा गौरव करून त्यांना सन्मानित केले . यावरून समजते की इंग्रजानांही दाखल
घ्यावी लागली एवढे प्रेरणादायी सावित्रीबाईंनी केले .पुढे जाऊन त्यांनी
ज्योतीबांच्या सामाजिक कार्यातही सक्रीय भाग घेतला .
गेल्या दीडशे
वर्षांपेक्षा जास्त कालखंडानंतर सावित्रीबाईंच्या विचारांचे स्मरण करण्याची
आवश्यकता आहे .त्यांचे विचार अभ्यासूपणे समजून घेतले पाहिजेत .
सावित्रीबाई या केवळ शिक्षिका नव्हत्या तर
उत्कृष्ट कवयत्री ,लेखिका
, समाजसेविका होत्या .या त्यांच्या गरुडभरारीवरून आजच्या
महिला – मुली निश्चितच प्रेरणा घेतील व आदर्श भारत घडवतील
अशी आशा वाटते .
जय हिन्द !
भा
र
ता
चा
इतिहास
१८४८ मध्ये
पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली ?
महात्मा जोतिबा फुले
१८६४ साली विधवा
पुनर्विवाह कोणी घडवून आणला ?
महात्मा जोतिबा फुले
२४ सप्टेंबर ,१८७३ रोजी
पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
महात्मा जोतिबा फुले
आर्य महिला
समाजाची स्थापना कोणी केली ?
पंडिता रमाबाई
शारदा सदन व
मुक्ती सदन यांची स्थापना कोणी केली ?
पंडिता रमाबाई
राष्ट्रीय मराठा
संघाची स्थापना कोणी केली ?
वि.रा.शिंदे
सार्वजनिक काका
म्हणून कोणाला ओळखत असत ?
गणेश वासुदेव जोशी
राजर्षी शाहू
महाराजांचे मूळ नाव काय होते ?
यशवंतराव जयसिंगराव
घाटगे
भोगावती नदीवर
राधानगरी हे धारण कोणी बांधले ?
शाहू महाराज
पुण्यातील अनाथ
बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली ?
महर्षी धोंडो केशव
कर्वे
हिंगणे येथे
महिला विद्यालयाची स्थापना कोणी केली ?
महर्षी धोंडो केशव
कर्वे
निष्काम
कर्ममठाची स्थापना कोणी केली ?
महर्षी धोंडो केशव
कर्वे
मराठी सत्तेचा
उदय हा ग्रंथ कोणी लिहिला ?
न्यायमूर्ती महादेव
गोविंद रानडे
सुधारक हे
वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
आगरकर
डेक्कन
एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?
टिळक व आगरकर
१९२७ मध्ये महाड
येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणी केला ?
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
१९३० मध्ये
नाशिक येथे काळाराम मंदिर प्रवेश कोणी सुरु केला ?
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला ?
१४ ऑक्टोबर , १९५६ रोजी
१९३२ मध्ये
हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली ?
महात्मा गांधी
बावनकशी सुबोध
रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला ?
सावित्रीबाई फुले
पत्री सरकारची
स्थापना कोणी केली ?
क्रांतिसिंह नाना
पाटील
भूदान चळवळ व
ग्रामदान चळवळीचे जनक कोण ?
आचार्य विनोबा भावे
महर्षी धोंडो
केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय ?
आत्मवृत्त
‘शिका,संघटित
व्हा व संघर्ष करा’ असा उपदेश कोणी केला ?
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर
ग्रामगीता हा
ग्रंथ कोणी लिहिला ?
राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज
तटबंदी असलेल्या
सामंतांच्या वाड्यांना काय म्हणत असत ?
गढी
इस्लाम धर्माची
शिकवण कोणी दिली ?
मुहम्मद पैगंबर
पाल सत्तेची
स्थापना कोणी केली ?
गोपाल
धर्मपालाने पाल
सत्तेची राजधानी कोठे नेली ?
पुंडवर्धनपूर
राष्ट्रकुल
घराण्यातील पहिला पराक्रमी राजा कोण ?
दंतिदुर्ग
चालुक्यांची
‘बदामी’ ही राजधानी कोणी जिंकून घेतली ?
राष्ट्रकूट राजा
पहिला कृष्ण
अमोघवर्षाने
राष्ट्रकुटांची राजधानी कोठे वसवली ?
मातखेड
चोळांचे राज्य
कोठे होते ?
तामिळनाडूमध्ये
इ.स.८५० मध्ये
चोळांची राजधानी कोणती होती ?
तंजावर
कोणत्या राजाने
संपूर्ण श्रीलंका जिंकून घेतली ?
पहिला राजेंद्र
पहिला राजेंद्र
याने कोणती नवी राजधानी उभारली ?
गंगौकोंड चोलपुरम
चोळांची सत्ता
कोणी संपुष्टात आणली ?
मलिक काफूर
गाहडवाल
घराण्याचा संस्थापक कोण ?
कृष्णराज
परमारांची
राजधानी कोणती ?
धार
तराईच्या लढाईत
पृथ्वीराजाने कोणाचा पराभव केला ?
मुहम्मद घोरीचा
यादव घराण्याचे
राज्य कोणत्या प्रदेशात होते ?
महाराष्ट्रात
कोणत्या यादव
राजाने राजधानी देवगिरी येथे नेली ?
पाचवा भिल्लम
यादव घराण्यातील
सर्वात कर्तबगार राजा कोण ?
दुसरा सिंघण
अरब व्यापारी
भारतात येताना आपल्याबरोबर काय आणत असत ?
खजूर व घोडे
केरळमधील
मलबारमधून कोणते लाकूड चीनला पाठवले जाई ?
शिसम
मध्ययुगीन काळात
भारतीय खेड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता ?
शेती
यादव काळात
कोणते सुवर्ण नाणे चलनात होते ?
पदमटंक
वेरूळ येथील
कोणते मंदिर हा कोरीवकामाचा अप्रतिम नमुना मानला जातो?
कैलासमंदिर