भारताचा इतिहास महत्वाचे 100 प्रश्न
01.चाफेकर बंधूनी रँडची हत्या केव्हा केली ?२२ जून १८९७
02. काकोरी कट केव्हा झाला ?
९ ऑगस्ट १९२५
03. मीरत कट केव्हा झाला ?
१९२९
04. चितगाव कटामध्ये कोणाचा विशेष सहभाग होता ?
स्त्रियांचा
05. किसान सभेची स्थापना कोणी केली ?
बाबा रामचंद्र (१९१८
06. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणास ओळखले जाते ?
आचार्य विनोबा भावे
07. क्रिप्स योजना केव्हा सुरु झाली ?
१९४२ साली
08. त्रीमंत्री योजना केव्हा जाहीर झाली ?
१६ मे १९४६ साली
09. राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली ?
ए.ओ.ह्यूम
10. आर्थिक निसःरणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
दादाभाई नौरोजी
11. १८८५ साली सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली ?
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
12. १८९० साली औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली ?
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
13. मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते ?
फिरोजशहा मेहता
14. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
फिरोजशहा मेहता
15. पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केव्हा झाली ?
१८८० साली
16. १८८१ साली केसरी (मराठी ),मराठा(इंग्रजी ) ही वर्तमानपत्रे कोणी सुरु
केली ?
लोकमान्य टिळक
17. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कोणी केली ?
लोकमान्य टिळक (१८८५)
18. शिवजयंती व गणेशोत्सव कोणी सुरु केले ?
लोकमान्य टिळक
19. गीतारहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला ?
लोकमान्य टिळक
20. घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
दिल्ली
21. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते ?
सच्चिदानंद सिन्हा
22. घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले होते ?
९ डिसेंबर , १९४६ साली
23. ११ डिसेंबर ,१९४६ रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची
निवड झाली ?
डॉ.राजेंद्रप्रसाद
24. घटना समितीने संविधान केव्हा स्वीकृत केले ?
२६ नोव्हेंबर ,१९४९ रोजी
25. भारतीय घटना केव्हा अंमलात आली ?
२६ जानेवारी १९५० रोजी
https://www.youtube.com/playlist?list=PLkEVI7wPogWfz8ydsLQkAgNS09pOVWS0c
5 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच
https://www.youtube.com/playlist?list=PLkEVI7wPogWfz8ydsLQkAgNS09pOVWS0c
२२ जुलै , १९४७ रोजी
27. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे रुंदी व लांबीचे गुणोत्तर किती आहे ?
२ : ३
28. घटना समितीचे सल्लागार कोण होते ?
बी.एन.राव
29. भाषिक तत्वावर स्थापन झालेले देशातील पहिले राज्य ?
आंध्रप्रदेश
30. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
31. घटना समितीने राष्ट्रगीतास संमती केव्हा दिली ?
२४ जानेवारी ,१९५० रोजी
32. राष्ट्रगीत किती सेकंदात गायले जाते ?
५२ सेकंदात
33. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
मोर
34. भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
आंबा
35. भारताची राष्ट्रीय नदी कोणती ?
गंगा
36. राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
डॉल्फिन
37. राष्ट्रीय लिपी कोणती ?
देवनागरी
38. भारताची राष्ट्रभाषा कोणती ?
हिंदी
39. अमेरिकेमध्ये गदर हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले ?
लाला हरदयाळ
40. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा केव्हा अस्तित्वात आला ?
१९०९ साली
41. कोणत्या कायद्याने भारतीय संघराज्याची कल्पना मान्य करण्यात
आली ?
१९३५ कायद्याने
42. देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा सुरु झाल्या ?
१९५२ साली
43. भारत-पाकिस्तान युद्ध केव्हा झाले ?
१९६५ साली
44. भारत-चीन युद्ध केव्हा झाले ?
१९६२ साली
45. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण ?
यशवंतराव चव्हाण
46. ‘जय जवान ,जय किसान’ ही घोषणा कोणी दिली ?
लालबहादूर शास्त्री
47. ईस्ट इंडिया असोशिएशियनची स्थापना कोणी केली ?
दादाभाई नौरोजी
48. दर्पण हे मराठी साप्ताहिक कोणी सुरु केले ?
बाळशास्त्री जांभेकर
49. लोकहितवादी या नावाने कोणास ओळखले जाते ?
गोपाळ हरी देशमुख
50. मानवधर्म सभा व परमहंस सभा कोणी स्थापन केली ?
दादोजी पांडुरंग तर्खडकर
51. भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध कोणी प्रस्थापित केले ?
पोर्तुगाल
52. २३ जून १७५७ रोजी कोणती लढाई झाली ?
प्लासीची
53. २३ ऑक्टोबर १७६४ रोजी कोणती लढाई झाली ?
बक्सारची
54. स्वराज्य ,स्वदेशी ,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा पुरस्कार
कोणी केला ?
लोकमान्य टिळक
55. १९१७ च्या राष्ट्रसभेच्या कोलकता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?
अँनी बेझंट
56. भारताच्या इतिहासातील कोणता कायदा काळा कायदा म्हणून
ओळखला जातो ?
रौलट कायदा (१९१९)
57. रौलट कायदा कधी अस्तित्वात आला ?
१९१९
58. जालियानवाला बाग येथे निरपराध लोकांवर गोळीबार करणारा इंग्रज
अधिकारी कोण होता ?
जनरल डायर
59. जालियानवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी कोणते कमिशनर
नेमले होते ?
हंटर कमिशनर
60. खिलापत चळवळ कधी सुरु झाली ?
१९१९ साली
61. खिलापत चळवळीचे अध्यक्ष कोण होते ?
महात्मा गांधी
62. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली ?
चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू
63. १९३४ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना कोणी केली ?
जयप्रकाश नारायण
64. सविनय कायदेभंगाचा लढा केव्हा सुरु झाला ?
१९३० साली
65. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला ?
पंडित जवाहरलाल नेहरू
66. महात्मा गांधी यांची हत्या केव्हा झाली ?
३० जानेवारी १९४८
67. महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली ?
नथुराम गोडसे
68. १२ मे १८५७ रोजी क्रांतिकारकांनी कोणास दिल्लीचा बादशहा म्हणून
घोषित केले ?
बहादूरशाह
69. ३० जून १८५७ रोजी क्रांतिकारकांनी कोणास पेशवा म्हणून
घोषित केले ?
नानासाहेब पेशवे (कानपूर येथे )
70. १८५७ च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती ?
३१ मे १८५७
71. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांचे मुख्य केंद्र कोणते होते ?
दिल्ली
72. संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणाचे आहे ?
राजा राममोहन रॉय
73. आत्मीय सभा या संघटनेची स्थापना कोणी केली ?
राजा राममोहन रॉय
74. १८७५ साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
स्वामी दयानंद सरस्वती
75. ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली ? (१८२८)
राजा राममोहन रॉय
76. गुरुकुल ही शिक्षणसंस्था कोणी चालू केली ?
स्वामी श्रद्धानंद
77. १८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?
स्वामी विवेकानंद
78. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन १८८५ मध्ये कोठे भरले ?
मुंबई
79. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण ?
व्योमेशचंद्र बॅनर्जी
80. मुस्लीम लीगची स्थापना केव्हा झाली ?
१९०६ साली (ढाका येथे )
81. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली ?
ढाका येथे
82. मुस्लीम लीगची स्थापना कोणी केली ?
नवाब सलीमुल्ला
83. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनात संमत झाला ?
लाहोर (१९३१ )
84. इ.स.१९१६ मध्ये होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?
अँनी बेझंट
85. महाराष्ट्रामध्ये होमरूल लीगची स्थापना कोणी केली ?
लोकमान्य टिळक (बेळगाव येथे १९१७ साली )
86. पंजाबचा सिंह कोणास म्हटले जाते ?
लाला लजपतराय
87. इ.स.१९२० मध्ये महात्मा गांधीनी कोणती चळवळ सुरु केली ?
असहकार चळवळ
88. वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
आद्य क्रांतिकारक
89. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली ?
श्यामजी कृष्ण वर्मा (१९०६ साली लंडन येथे )
90. कर्झन वायलीचा वध कोणी केला ?
मदनलाल धिंग्रा (१९४० साली )
91. कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला ?
अनंत कान्हेरे (१९०९ साली )
92. महात्मा गांधींनी १९१८ मध्ये कोणता सत्याग्रह केला ?
खेडा सत्याग्रह
93. महात्मा गांधींची दांडी यात्रा केव्हा सुरु झाली ?
१२ मार्च १९३०
94. महात्मा गांधी दांडी येथे केव्हा पोहोचले ?
५ एप्रिल १९३०
95. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केव्हा केला ?
६ एप्रिल १९३०
96. पुणे करार केव्हा झाला ?
२५ सप्टेंबर १९३२
96. मित्रमेळा संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
१ जानेवारी १९०० साली
97. मित्रमेळा संघटनेची स्थापना कोणी केली ?
विनायक दामोदर सावरकर
98. मित्रमेळा संघटनेचे रुपांतर कशात झाले ?
अभिनव भारत या संघटनेत
99. पुणे करार कोणा-कोणात झाला ?
महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यात
100 . देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा सुरु झाल्या ?
१९५२ साली
धन्यवाद !
No comments:
Post a Comment