Monday, November 1, 2021

अलंकारिक शब्द

 



अलंकारिक शब्द

  1.  अष्टपैलू – सर्वगुणसंपन्न
  2. अकरावा रुद्र – अतिशय तापट माणूस
  3. अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस 
  4. अकलेचा कांदा -   मूर्ख
  5. अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
  6. अळवावरचे पाणी – फार काळ न टिकणारे
  7. अक्षरशत्रू – निरक्षर ,अडाणी .
  8. ओनामा – सुरुवात ,प्रारंभ.
  9. उंटावरचा शहाणा – मूर्खपणाचा सल्ला देणारा .
  10. उंबराचे फूल – दुर्मीळ वस्तू .
  11. कर्णाचा अवतार – उदार मनुष्य .
  12. कळसूत्री बाहुले – दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा .
  13. कळीचा नारद – कळलावणारा.
  14. काडीपहिलवान – हडकुळा .
  15. कुंभकर्ण – अतिशय झोपाळू .
  16. कूपमंडूक – संकुचित वृत्तीचा.
  17. कोल्हेकुई – क्षुद्र लोकांची बडबड .
  18. खडाजंगी – मोठे भांडण .
  19. खडाष्टक – जोरदार  भांडण.
  20. खुशालचेंडू – चैनीखोर माणूस.
  21. खेटराची पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे.
  22. गर्भश्रीमंत – जन्मापासून श्रीमंत.
  23. गंगा-यमुना – अश्रू
  24. गंडांतर – भीतिदायक संकट .
  25. गाजरपारखी – कसलीही पारख नसलेला , मूर्ख .
  26. गुरुकिल्ली – मर्म,रहस्य .
  27. गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा .
  28. गोगलगाय – गरीब,निरुपद्रवी मनुष्य .
  29. घरकोंबडा – घराबाहेर न पडणारा .
  30. घोरपड – चिकाटी धरणारा .
  31. चर्पटपंजरी – निरर्थक बडबड.
  32. चौदावे रत्न – मार .
  33. छत्तीसचा आकडा – शत्रुत्व .
  34. जमदग्नीचा अवतार – रागीट .
  35. टोळभैरव – कामात नासाडी करणारे लोक .
  36. ताटाखालचे मांजर – दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा .
  37. त्रिशंकू – धड ना इकडे,धड ना तिकडे .
  38. दगडावरची रेघ – कधीही न बदलणारे .
  39. दळुबाई – भेकड मनुष्य .
  40. देवमाणूस – चांगला ,सज्जन माणूस .
  41. धोपट मार्ग – सरळ,नेहमीचा मार्ग .
  42. नवकोट नारायण – खूप श्रीमंत .
  43. नंदीबैल – होला हो म्हणणारा .
  44. पर्वणी – अतिशय दुर्मिळ योग .
  45. पाताळयंत्री – कारस्थान करणारा .
  46. पांढरा कावळा – निसर्गात नसलेली वस्तू.
  47. पांढरा परीस – लबाड .
  48. पिकले पान – म्हातारा .
  49. पोपटपंची – अर्थ न कळता पाठांतर करणारा .
  50. बृहस्पती – बुद्धिमान .
  51. बिनभाड्याचे घर – तुरुंग .
  52. बोकेसंन्यासी – ढोंगी मनुष्य .
  53. बोलाचीच कढी – केवळ शाब्दिक वचने.
  54. भगीरथ प्रयत्न – आटोकाट प्रयत्न .
  55. भाकडकथा – बाष्कळ गोष्टी .
  56. भीष्मप्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा .
  57. मंथरा – दुष्ट स्त्री.
  58. मायेचा पूत – पराक्रमी मनुष्य ,मायाळू.
  59. मारुतीचे शेपूट – लांबत जाणारे काम .
  60. मृगजळ – केवळ आभास.
  61. मेषपात्र – बावळट.
  62. रामबाण औषध – अचूक गुणकारी.
  63. लंकेची पार्वती – अत्यंत गरीब स्त्री.
  64. लंबकर्ण – बेअकली.
  65. वाटण्याच्या अक्षता – नकार.
  66. वामनमूर्ती – ठेंगू किंवा बुटका माणूस.
  67. वाहती गंगा – आलेली संधी .
  68. शकुनीमामा – कपटी मनुष्य .
  69. शेंदाड शिपाई – भित्रा.
  70. श्रीगणेशा – प्रारंभ .
  71. सव्यसाची – उलटसुलट काम करणारा .
  72. स्मशानवैराग्य – तात्कालिक वैराग्य .
  73. सांबाचा अवतार – अत्यंत भोळा माणूस.
  74. सुळावरची पोळी – जीव धोक्यात घालणारे काम .
  75. सूर्यवंशी – उशिरा उठणारा . 

 

 


No comments:

Post a Comment