मराठी म्हणी व त्यांचा अर्थ
1.खाण तशी माती -जसे
आईबाप तसे मूल .
2.खायला
काळ , भुईला भार - ज्याचा कोणाला काही उपयोग
नाही असा माणूस .
3.खुट्याची
सोडली अन झाडाले बांधली - कुठेही शेवटी बंधनातच असणे .
4.खरा मोती गागऱ्यात लपला - खऱ्याची पारख नसणे .
5.खातो दोन आन्याचं , अंगात सतरा आन्याचं - केवळ बढाया मारणे .
6.खाटिकाला शेळी धार्जिणी - कठोर व्यक्तीला घाबरून सारे त्याच्या इच्छेनुसार
काम करतात .
7.खिळ्यासाठी नाल गेला , नालासाठी घोडा गेला - लहानश्या गोष्टीची
उपेक्षा केल्यास भयानक परिणाम .
8.गर्जेल तो वर्षेल काय ? - जो वटवट करतो त्याचे
हातून प्रत्यक्ष काय कार्य घडेल .
9.गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाला अखेर लज्जित व्हावे लागते .
10.गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी - एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग होत नाही
.त्याचा फायदा करून घेतला पाहिजे .
11.गाढवाला गुळाची चव काय ? - गार पारख्याला
रत्नाची परीक्षा कशी
काय करता येईल .
12.गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता - मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीच
परिणाम होत नाही .
13.गाव करी ते राव न करी - समुदायाने जे काम होईल ते राजाच्या हातूनही होणार
नाही .
14.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून
खाल्ली - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तम नाहीतर तिचा
उपयोग अन्य तऱ्हेने करता येईल .
15.गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्या लोकांबरोबर आश्रितांचाही फायदा होतो .
16.गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य - एखाद्याचे घ्यावयाचे आणि त्यालाच द्यावयाचे .
17.गोरा गोमटा कपाळकरंटा - दिसण्यात सुंदर पण नशिबाने दुर्दैवी .
18.गोष्ट लहान सांगणं महान - क्षुल्लक गोष्टीचा उदोउदो करणे .
19.गरिबी हरिबी काही हातची नाही - काळ काही आपल्या हातचा नाही .
20.गरिबानं खपावं ,धनिकानं चाखावं - गरिबानं कष्ट करावेत श्रीमंतानं माल खावा .
21.गोष्टी गोष्टी अन मेला कोष्टी - लांबलचक गोष्टी केल्यास मूळ कामधंदा बाजूला राहून
नुकसान होते .
22.गोफण गेली तिकडे गोटा पडला इकडे - कोणत्याही कामात
ताळमेळ नसणे .
23.गाव सगळा मामाचा एक नाही कामाचा - अनेक सगेसोयरे असूनही प्रसंगी कुणीच मदत करीत
नाही .
24.गरज सरो , वैद्य मरो - गरज असेपर्यंत पुढे पुढे करणे मग न विचारणे .
25.गरिबाच्या दाराला सावकाराची कडी - गरिबांवर सावकाराचा अंमल .
26.घरोघरी मातीच्या चुली - जिकडे तिकडे सारखीच परिस्थिती असणे .
27.घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - प्रतिकूल परिस्थिती आल्यास सर्वच उलटे वागतात .
28.घर बांधून पाहावे , लग्न करून पाहावे - घर बांधायला अथवा
लग्न करायला अंदाजापेक्षा अधिक खर्च येतो .
29.घरची ओस अंगण सांगते - घरात किती टापटीप आहे हे त्याच्या अंगणावरून
समजते .
30.घर ना दार देवळी बिऱ्हाड - फकीरासारखे जीवन जगणे .
31.घुगऱ्या मूठभर सारी रात मरमर - कमाई थोडी पण खर्चच फार .
32.घरात नाही कौल , रिकामा डौल - घरात गरिबी पण रिकामीच ऐट .
33.घडाईत परीस मढाईत जास्त - बनविण्यापेक्षा
दुरुस्तीचाच अधिक खर्च .
34.घोड्यावर हौदा , हत्तीवर खोगीर - एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे .
35.घोडी मेली ओझ्याने , शिंगरू मेले
हेलपाट्याने - आई काम करून थकते आणि
तिचे मूल तिच्या मागे फिरून फिरून थकून जाते .
36.चार दिवस सासूचे ,चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला काही दिवस
अधिकार मिळतो .
37.चोरावर मोर - एकापेक्षा एक सवाई अपराध
करणारा .
38.घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे - स्वतःचा खर्च करून
इतरांची कामे करणे .
39.चोराची पावले चोरास ठाऊक - चोराची कृत्ये , लबाड्या चोरालाच माहित .
40.घरासारखा गुण , सासू तशी सून - लहान मोठ्यांचे अनुकरण
करत असतात .
41.चमत्कारावाचून नमस्कार नाही व पराक्रमावाचून पोवाडा
नाही - काही विशेष कार्य
केल्याशिवाय लोक मान देत नाहीत .
42.चांदणे चोराला , ऊन घुबडाला - चांगल्या गोष्टी
दुर्जनाला आवडत नाहीत .
43.चालत्या गाड्याला वंगण कोणीही घालील - ज्याच्याजवळ सर्व काही
आहे त्याला मदत करण्यास कोणीही तयार असते .
44.चिंता करी ते येई घरा - दुसऱ्याचे वाईट व्हावे
अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते .
45.चोर तो चोर वर शिरजोर - चोरी तर केली आणि वर
आणखी शिरजोरी .
46.जळत्या घरचा पळता वासा - दिवाळखोर गृहस्थाच्या
इस्टेटीतून जे काय हाती लागेल तेवढेच .
47.जन्मा घालील तो भाकर देईलच - जो आपणास जन्म देतो तो
आपले पालनपोषण करतोच करतो .
48.जळात राहून माशाशी वैर करू नये - जेथे आपण राहतो तेथे सलोख्याने राहावे .
49.जशी देणावळ तशी धुणावळ - आपण जसे दुसऱ्याच्या
उपयोगी पडतो तसे दुसरे आपल्या उपयोगी पडतात .
50.जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - माणसाला ज्या सवयी
लागतात ,त्या शेवटच्या
क्षणापर्यंत असतात .
51.जनात एक मनात एक - दुटप्पी वर्तनाचा मनुष्य
.
52.जनात बुवा आणि मनात कावा
- बाह्य जगात बुवा पण मनात
कपट .
53.जन्मा आला हेला ,पाणी वाहता वाहता
मेला - निर्बुद्ध लोक कष्ट करता
करताच मारतात .
54.जशास तसे - एकाने केले त्याचप्रमाणे
दुसऱ्याने वागावे .
55.जसा भाव तसा देव - ज्याप्रमाणे देवाची
भक्ती असते त्याप्रमाणेच फळ मिळते .
56.जसा राजा तशी प्रजा - ज्याप्रमाणे राजाचे
वर्तन असते , तसेच प्रजेचे .
57.जसे करावे तसे भरावे - जसे कर्म करावे तसे फळ
मिळते .
58.टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही - अपार कष्ट सोसावेत
तेव्हा कुठे वैभव प्राप्त होत असते .
59.झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी - ज्या गोष्टी शक्य नाहीत
अशा गोष्टी करणे .
60.झोपेला धोंडा ,भुकेला कोंडा - भूक लागली की
कण्या-कोंडाही
चालतो ,थकल्यावर कोठेही झोप
येते .
61.हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये - दूरचे मिळण्याच्या आशेने
जवळचे गमावू नये .
62.झाकली मूठ सव्वा लाखाची - आपल्याजवळ जे आहे
त्याविषयी न सांगितलेलेच बरे .
63.डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही - कोणतीच गोष्ट साध्य होत
नाही .
64.डोंगर पोखरून उंदीर काढणे - मोठ्या प्रमाणावर कष्ट
करून हाती अत्यल्पच यश लागणे .
65.तन खाई धन - शेतात तनकट असेल तर पीक
वाढत नाही .
66.ताकापुरती आजी - ज्याच्याकडून काम करून
घ्यावयाचे असते त्याची प्रशंसा करतात .
67.ताकापुरते रामायण - काम साधण्यापुरते आर्जव
.
68.ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या पूर्ण अधीन
असणे .
69.तुझे माझे जमेना , तुझ्यावाचून करमेना
- एकमेकाशी झगडत राहणे , पण एकमेकांखेरीज न करमणे
.
70.तेल गेले ,तूप गेले – हाती धुपाटणे राहिले
- दोन्हीकडून फायदा व्हावा
म्हणून प्रयत्न करणे पण शेवटी दोन्हीकडून निराशाच पदरी पडणे .
71.तोंड दाबून बुक्क्यांचा मार - आपले नुकसान होत आहे
तरीही लाचारीने शांत राहणे अशी परिस्थिती .
72.थेंबे थेंबे तळे साचे - एका एका वस्तूचाही
हळूहळू संग्रह केला असता कालांतराने मोठा संचय होतो .
73.थोडे बोलणे , बहुत करणे - बोलावे थोडे पण कृतीच
पुष्कळ करावी .
74.दमडीची कोंबडी रुपयांचा मसाला - क्षुल्लक गोष्टीसाठी
अधिक खर्च .
75.दहा गेले पाच राहिले - आयुष्याची बरीच वर्षे
निघून गेली आता फार थोडी राहिली .
76.दही खाऊ की मही खाऊ - हे करू की ते करू .
77.दळील तो भरील , करील तो पावेल - जो कष्ट करील त्याला
त्याचे फळ मिळेल .
78.दात आहेत तर चणे नाहीत ,चणे आहेत तर दात
नाहीत - पूर्ण सुखसमाधान,शांती कधीच लाभत नसते
.प्रत्येकवेळी काही ना काही कमतरता असतेच
.
No comments:
Post a Comment