Thursday, November 4, 2021

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

 


     




                             मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 


1.आठ हात लाकूड नऊ हात ढलपी – अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती .

2.आधी पोटोबा मग विठोबा - आधी जेवण मग परमेश्वराचे नामस्मरण .

3.आंधळ्या बहिर्‍याची गाठ - कर्तृत्वहीन मनुष्याची परस्परांना मदत करण्यास असमर्थता .

4.आपलेच दात आपलेच ओठ - सर्व आपलेच सगेसोयरे .

5.आपली पाठ आपणास दिसत नाही - स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत  .







6.आपला हात जगन्नाथ - स्वतःसाठी हवे तेवढे घेण्याची मोकळीक .

7.हपापाचा माल गपापा  - फुकट मिळालेला माल उधळेपणाने मनुष्य खर्च करतो .

8.आपण हसे लोकाला , शेंबूड आपल्या नाकाला - आपल्यात जो दुर्गुण आहे त्याच दुर्गुणाबद्दल दुसर्‍याला दोष देणे .

9.आयत्यावर कोयता - श्रम न करता मिळालेली संपत्ती खर्च करण्यास न कचरणे .

10.आधी जाते बुद्धी , मग जाते लक्ष्मी -माणूस प्रथम विवेकभ्रष्ट होतो , मग त्याचे नुकसान होत जाते .







11.आयत्या बिळात नागोबा - दुसर्‍याच्या श्रमाचे फळ स्वतःकडे घेऊ पाहणे .

12.आसू ना मासू , कुत्र्याची सासू - जेथे जिव्हाळा नाही , तेथे दुःख नाही .

13.इकडे आड , तिकडे विहीर - दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे .

14.इन मीन सव्वा तीन - फार अल्पसंख्या .

15.इच्छा तसे फळ - जशी वासना असते तसे फळ मिळते .

16.इच्छा तेथे मार्ग - कोणतीही गोष्ट करावयाची इच्छा असली की काहीतरी   मार्ग सुचतोच .

17.इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राजे होते - इच्छेनेच सारे घडले असते तर सर्वांजवळ भरपूर धनसंपत्ती असती .










18.ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो -  जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच .

19.उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग   - उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन होते .

20.उथळ पाण्याला खळखळाट फार - अल्पज्ञानी फार बढाया मारतो .

21.उधारीचे पोते सव्वा हात रिते - उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो .

22.उद्योगाचे घरी रिद्धी -सिद्धि पाणी भरी -   जो मनुष्य उद्योग करतो त्याच्या घरी समृद्धी येते .

23.उभा जोवरी अन शोभा तोवरी - जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत चलती असते .







24.उधार तेल खवट - उधारीच्या वस्तूत काही ना काही कमी असतेच .

25.उडाला तर कावळा ,बुडाला तर बेडूक -   एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते .

26.उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे - श्रीमंत माणसापाशी खुशामत करणारे गोळा होत असतात .

27.उकराल माती तर पिकतील मोती - मशागत केल्यास चांगले पीक येते .

28.उचलली जीभ लावली टाळ्याला - मन मानेल तसे बोलणे .

29.उंदीर गेला लुटी ,आणल्या दोन मुठी  - प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम   करतो .

30.उंदराला मांजर साक्ष - संकटसमयी शत्रूस सहाय्य .

31.ऊन पाण्याने घरे जळत नसतात - खोटे आरोप केल्याने अपकीर्ती होत नसते .







32.ऊस गोड पण मुळया सोड - परोपकारी माणसाला फार छळू नये .

33.ऊसाच्या पोटी काऊस - सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती .

34.ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये -    एखादी गोष्ट आवडली असली तरी तिचा अतिलोभ बाळगू नये .

35.ऋण फिटेल पण हीन फिटत नाही  - कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य काढून टाकता येत नाही .

36.ऋतूत ऋतू वसंत ऋतू - सर्व ऋतूत वसंत ऋतू श्रेष्ठ आहे .

37.ऋषीचे कूळ आणि हरळीचे मूळ पाहू नये - असे करण्यास खूप खोल शिरावे लागते .

38.एक पथ दो काज - एकाच मार्गावरची दोन कामे एकाच खेपेत करणे  .

39.एक ना धड भराभर चिंध्या - कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे .

40.एक घाव दोन तुकडे - एका झटक्याने वादग्रस्त गोष्टीचा निकाल .







41.क से दो भले -एकापेक्षा दोघे बरे .

42.एकाची जळते दाढी , दुसरा त्यावर पेटवितो विडी -दुसऱ्यावर संकट आहे हे न पाहता आपला अल्पसा का होईना फायदा करून घेणे .

43.एका कानाने ऐकावे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे -एखादी गोष्ट ऐकावी पण उपयोगाची नसेल तर लगेच सोडून द्यावी .

44.एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये -    एखाद्याने मोठी वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहान का होईना दुसरी वाईट गोष्ट करू नये .

45.एका पुताचे माय वळणी वाटे प्राण जाय -एकटाच पुत्र असूनही सुखी नसणे  .

46.एका हाताने टाळी वाजत नाही -भांडणाचा दोष एकट्याला देता येत नाही .

47.एकटा जीव सदाशिव -एकट्या माणसाला कशाचीही चिंता नसते .









48.एक पाय तळ्यात नि एक पाय मळ्यात -दोन्ही गोष्टींवर अवलंबून राहणारा .

49.ऐकावे जनाचे करावे मनाचे -   सर्वांचा विचार घ्यावा ,परंतु आपल्याला योग्य वाटेल तेच करावे .

50.ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही -जो आपण सांगितलेले ऐकत नाही त्याला सांगण्याचे व्यर्थ श्रम घेऊ नये .

51.ओ म्हणता ठो येईना - अगदीच अक्षरशत्रू असणे .

52.ओठात एक पोटात एक - मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे .

53.ओठातून की पोटातून - वरवर की मनापासून .







54.एका माळेचे मणी एकसारखे गणी -सारख्या पदावर असलेल्याचा सारखाच स्वभाव .

55.ओले जळते आणि वाळलेलेही जळते -वाईटाबरोबर चांगल्या माणसाचेही    नुकसान होणे .

56.ऐतखाऊ गोसावी ,टोळभैरव बैरागी -आळशी लोकांचीही कधी कधी चंगळ असते .

57.ओठी तेच पोटी -बोलावे तसेच वागावे .

58.औट घटकेचे राज्य - थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य .

59.कडू कारले तुपात तळले ,साखरेत घोळले तरी कडू ते कडूच -ज्याचा स्वभाव जन्मतःच वाईट आहे त्याला कितीही सुधारायचे  प्रयत्न केले  तरी त्याचा स्वभाव बदलत नाही .

60.औषधावाचून खोकला गेला - विघ्न परभारेच टळले .








61.करंगळी सुजली म्हणून डोंगराएवढी होईल काय ? - प्रत्येक गोष्टीच्या वाढीला मर्यादा असतेच .

62.कर नाही त्याला डर कशाला ?-ज्याने वाईट आचरण केले नाही त्याला भीती का वाटेल ?

63.करावे तसे भरावे - जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे .

64.कधी खावे तुपाशी कधी राहावे उपाशी -सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते .

65.कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर - ऐकण्यात आणि पाहण्यात फार तफावत असते .

66.काडीचोर तो माडीचोर -जो लहानपणी चोरी करतो असे सिद्ध झाले तर त्याच्यावर पुढे मोठ्या चोरीचा आळ आणतात .

67.काकडीची चोरी फाशीची शिक्षा -लहानशा अपराधाला फार मोठी शिक्षा होणे .







68.कामापुरता मामा -गरजेपुरते गोड बोलणारा .

69.कानेकोपरे विसरू नका ,पायलीपसा भुकू नका - शेताचा कानाकोपरा पेरला गेला पाहिजे नाहीतर पीक कमी येईल .

70.कुडास कान ठेवी ध्यान - भिंतीच्या आडून एखाद्याने गोष्टी ऐकल्या म्हणजे त्या बाहेर फुटतात .

71.कावळ्याच्या शापाने गाईगुरे मरत नसतात -क्षुद्र माणसाने थोरामोठ्यांना कितीही दूषण दिले तरी थोरामोठ्यांचे काहीही बिघडत नाही .

72.कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ  -  देशद्रोही माणूस आपल्या देशबांधवांचे नुकसान करणारच .

73.केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी - अत्यंत गरिबीची अवस्था .

74.कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची तट्टाणी - एक अतिशय थोर तर एक अतिशय क्षुद्र .

75.कोळसा उगाळावा तितका काळाच - वाईट ते वाईटच .

76.कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही - एखादी बातमी बाहेर फुटू नये म्हणून कितीही प्रयत्न केले तरी ती बातमी बाहेर फुटायची राहत नाही .









77.कोल्हा काकडीला राजी - क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात .

78.खतावीण शेती , करी सोन्याची माती  -   शेतात खत घातले नाही तर चांगले पीक येत नाही .

79.खत कसदार तर पीक भरदार - चांगले खत घातले तर भरपूर पीक येते .

80.आग सोमेश्वरी , बंब रामेश्वरी - जेथे मदतीची गरज आहे ,तेथे ती न पोहचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे .

81.आवळा देऊन कोहळा काढणे - क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे .

82.असतील शिते तर जमतील भुते - आपला भरभराटीचा काळ असला ,तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात .

83.आलीया भोगासी असावे सादर - जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे .









84.अडाण्याची मोळी ,भलत्यासच गिळी - अडाणी मनुष्याने केलेल्या गोष्टीचा परिणाम विपरीत होतो .

85.अंथरूण पाहून पाय पसरावे - ऐपतीच्या मानाने खर्च करावा .

86.अठरा विश्वे दारिद्र्य - अतिशय गरिबी

87.अचाट खाणे , मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास वाईट परिणाम होतो .

88.अळीमिळी गुपचिळी - गुप्तपणे केलेले एखादे काम .

89.अडला हरी गाढवाचे पाय धरी - प्रसंगी शहाणा माणूसदेखील अडाणी माणसाची आर्जवे करतो .

90.क्षीर नीर निवडणे  - दूध व पाणी एकत्र असता वेगळे करणे .

91.मेसारखे तप नाही - क्षमाशील बनणे ही फार कठीण गोष्ट आहे .






92.क्षणं चित्त क्षणं वित्त - आयुष्य आणि धन हे क्षणभंगुर असते .

93.हातावर कमवावे ,पानावर खावे - रोजच्या रोज श्रम करून निर्वाह करणे .

94.हातावर पोट भरले आणि दिवस काढले - श्रम करून कसेतरी पोट भरले .

95.असतील शिते तर जमतील भुते - जवळ संपत्ती असेल तर शेकडो लोक सभोवती जमा होतात .

96.अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम दुःखदायक होतात .

97.अति शहाणा त्याचा बैल रिकामा -जो मनुष्य अति शहाणपणा करतो तो शेवटी फसतो .

98.हातात नाही दमडी ,बदवली कोंबडी - हाती पैसा नसताना व्यवहार करणे .

99.हसत हाती काम , मुखी नाम -प्रभूनामस्मरण आणि उद्योग एकाच वेळी सुरू करणे .








100.असंगाशी संग प्रणाशी गाठ - भलत्याच माणसाशी मैत्री जडली तर प्राण धोक्यात येतात .

101.अडक्याची भवानी सापिकेचा शेंदूर - क्षुल्लक वस्तूसाठी भरमसाठ खर्च करणे .

102.अल्प बुद्धी बहु गर्वी - कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो .

103.अकातली गाय अन काटे खाय - दुःखी व्यक्ती काहीही करायला तयार असते .

104.आंधळ्या गायीत लंगडी गाय प्रधान - अडाणी लोकांत जरासा शहाणा पंडितासारखा वागतो .

105.आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन - अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळणे .

106.अगं अगं म्हशी मला कुठं नेशी - पोकळ सबब सांगून आपली फजिती लपविण्याचा  प्रयत्न करणे .

107.असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा - असेल तर खूप उधळपट्टी करणे नसेल तर    उपाशी राहणे .

108.अति राग भीक माग - अति रागाने एखादे कृत्य केले तर शेवटी तो भिकेस लागतो .










109.अंगापेक्षा बोंगा मोठा - खर्‍या गोष्टीपेक्षा अवडंबरच अधिक .

110.अति झाले आसू आले - एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती गोष्ट दुःखदायी ठरते .

111.अंतकाळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण - मरणाच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक . 

112.आईची माया अन पोर जाईल वाया - फार लाड केले तर मुलं बिघडतात . 

113.आजा मेला नातू झाला , घर जीव बरोबर - कुटुंबातील एक मनुष्य मरण पावला पण एक जीव जन्माला आला तेव्हा शेवटी घराचे जीव बरोबर . 

114.आयजीच्या जिवावर बायजी उधार - दुसर्‍याचा पैसा हवा तसा उधळणे . 

115.आज अंबारी उद्या झोळी - कधी वैभव तर कधी दैन्य .






116.आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार ? आत जे नाही ते बाहेर कसे दिसेल ?

117.खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी - असले तर चैन नाही तर उपवास .

 

 

 

 

 

 


 

 

No comments:

Post a Comment