Saturday, November 6, 2021

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

 






डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

इतिहासाला विसरा असे लोकांना सांगणे चूक आहे ,जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकणार नाहीत .

मूक अवस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य ,असा माझा विश्वास आहे .

माणसांपेक्षा पुस्तकांचा सहवास मला अधिक आवडतो .

प्रथम लोकांच्या विचारात क्रांती  करावी लागेल ,मग आचारात क्रांती होते .

शिका ,संघटित व्हा ,संघर्ष करा .

अन्यायासमोर नमते घेऊ नका .

गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करून उठेल .

कार्याच्या मुळाशी जर सत्य असेल तर त्यात यश प्राप्त होण्यास चिंता करण्याचे विशेष कारण नाही .

वाचन थांबले तर जगून काय उपयोग .

कोणत्याही कार्यात यशप्राप्ती होईल किंवा नाही हे जितके साधनसामुग्रीच्या प्रमाणावर

 अवलंबून असते ,तितकेच ते कार्याच्या नैतिक स्वरूपावरही अवलंबून असते .

मनाचे स्वातंत्र्य हे जिवंतपणाचे लक्षण आहे .

प्रत्येक मनुष्यास जीवनाचे तत्वज्ञान असावयास हवे ,कारण तत्वज्ञान म्हणजे दुसरे काही नसून ज्याने आपले जीवन मोजायचे ती मापकाठीच होय .

सत्याग्रहीच्या ठायी आत्मबल पाहिजे .आत्मबल हे आपण करतो ती गोष्ट योग्य आहे किंवा नाही

 यावर अवलंबून असते

ज्यावेळी माणसांची ,आपण करीत असलेल्या श्रमाचा ,आपल्याला

न्याय मोबदला मिळतो अशी समजूत असते त्यावेळी मानवी जीवन हे उत्साही ,

समृद्ध आणि प्रेरणादायी असते .

जागृतीचा विस्तव कधीही विझू देता कामा नये .

जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही व दुसर्‍याच्या हातचे बाहुले

 न होण्याइतकी बुद्धी ,स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे .

उदासिनता हा फार वाईट रोग आहे .

ज्या कार्यामुळे लोकसंग्रह होतो ते सत्कार्य व त्यासाठी केलेला आग्रह म्हणजे सत्याग्रह .

तुमचा उद्धार करण्यास कोणी येणार नाही ,तुम्ही मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करण्यास समर्थ व्हाल .

सामर्थ्याशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही .



मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही ,त्याला सुसंस्कृतीची गरज आहे .

आपल्याला कितीही त्रास झाला तरी आपण केलेली प्रतिज्ञा आपण

 कधीच मोडता कामा नये .

बुद्धिमत्ता हा गुण नसून साधन आहे व तिचा उपयोग कसा करावा हे

 बुद्धिमान व्यक्तीच्या अंतिम हेतूवर अवलंबून आहे .

व्यक्तीचा विकास हाच राष्ट्राचा विकास .

व्यक्तीपेक्षा देश मोठा असतो .

 समाजापुढे एखादा पेचप्रसंग उद्भवला तर त्यातून समाजाला

 सुरक्षितपणे बाहेर पडण्याचा मार्ग जो सुचवितो तो थोर .

लोकशाही हा शासनव्यवस्थेचा प्रकार नसून तो समाजव्यवस्थेचा प्रकार आहे .

नवे घडवायचे असेल तर जीर्ण चौकटी मोडाव्या लागतात .

माणसाला माणूस म्हणून ओळखा आणि जगू द्या  .

केवळ विरोधासाठी विरोध न करता तत्वासाठी विरोध केला पाहिजे .

शिक्षणाशिवाय माणसाला स्वतःची ओळख होऊ शकत नाही .

आपल्याला जर प्रगती साधावयाची असेल तर इतिहासाची पुनरावृत्ती

होऊ देण्यात काही अर्थ नाही . त्यापासून बोध घेऊन नवा इतिहास घडविण्याची आपण उमेद बाळगली पाहिजे .

 

 


No comments:

Post a Comment