Thursday, November 25, 2021

सामान्यज्ञान - भारताचा इतिहास - महत्वाचे प्रश्न

 

भारताचा

तिहास

जयदेवाने कोणते काव्य लिहिले ?

गीतगोविंद

सिद्धांतशिरोमणी हा ग्रंथ कोणी लिहिला ?

भास्कराचार्य

मराठी भाषेचा आद्यकवी म्हणून कोणास ओळखले जाते ?

मुकुंदराज

मुकुंदराजाने मराठी भाषेतील कोणता अद्यग्रंथ लिहिला ?

विवेकसिंधू

कुतुबमिनारच्या बांधकामास कोणाच्या काळात सुरुवात झाली ?

कुतुबुद्दीन ऐबक

दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोण ओळखला जातो ?

अल्तमश

अल्तमशने कोणते चांदीचे नाणे पाडले ?

टंका

मुहम्मद तुघलकाने देवगिरीचे नाव काय ठेवले ?

दौलताबाद

कुतुबमिनारचे काम कोणाच्या काळात पूर्ण झाले ?

फिरोज तुघलक

तुघलक घराण्यातील शेवटचा सुलतान कोण होता ?

नसिरुद्दीन महमूद

विजयनगरची राजधानी कोणती होती ?

हंपी

विजयनगरचा पहिला राजा कोण ?

हरिहर

विजयनगर राज्याच्या इतिहासातील सर्वात कर्तबगार राजा कोण ?

कृष्णदेवराय

बहमनी राज्याचा पहिला सुलतान कोण ?

हसन गंगू

बहमनी राज्याचा पहिला सुलतानहसन गंगू याने आपली राजधानी कोठे स्थापन केली ?

गुलबर्गा

गुजराती भाषेचे आद्यकवी म्हणून कोणाला ओळखले जाते ?

संत नरसी मेहता

संत मीराबाई या कोणत्या राजघराण्यातील होत्या ?

मेवाडच्या राजघराण्यातील 

हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणते काव्य लिहिले ?

सूरसागर

गुरुगोविंदसिंग हे शिखांचे कितवे गुरु होते ?

१० वे गुरु

मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?

बाबर

भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी वापर कोणी केला ?

बाबरने

शेरशाहने दिल्ली येथे कोणत्या घराण्याची सत्ता स्थापन केली ?

सूर घराण्याची

शेरशाहने कोणते नाणे सुरु केले ?

रुपया

पानिपतची दुसरी लढाई कोणामध्ये झाली ?

अकबर व हेमू

पानिपतच्या दुसऱ्या लढाईत कोणाचा विजय झाला ?

अकबर

पानिपतची दुसरी लढाई कोणत्या साली झाली ?

इ.स. १५५६

अकबराच्या दरबारात कोणता संगीतसम्राट होता ?

तानसेन

जहांगीरच्या मृत्यूनंतर कोण बादशहा झाला ?

जहांगीरचा मुलगा शाहजहान

औरंगजेबाने शाहजहानला कोणत्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले ?

आग्र्याच्या

आहोमांनी भारतात कोणत्या प्रदेशात आपले वर्चस्व प्रस्थापित केले ?

ब्रम्हपुत्रेच्या खोऱ्यात

गुरुतेगबहाद्दूर हे शिखांचे कितवे गुरु होते ?

नववे गुरु

शिखांचे दहावे गुरु गुरुगोविंदसिंग यांचा इ.स.१७०८ मध्ये कोठे मृत्यू झाला ?

नांदेड येथे

मुर्शिदकुलीखान याने बंगालची राजधानी कोठे नेली ?

मुर्शिदाबाद

बंदा बैरागीने कोणाच्या नावे नाणी पडली ?

गुरुनानक व गुरुगोविंदसिंग

मुघलकालीन सोन्याच्या नाण्यास काय म्हणत ?

मोहर

मुघल बादशाहांनी कोणती तांब्याची नाणी पडली ?

दाम

ताजमहाल ही वास्तू शाहजहानने कोणाच्या स्मरणार्थ बांधली ?

मुमताजमहल

ताजमहाल ही सौंदर्यपूर्ण वास्तू कोणत्या शहरात आहे ?

आग्रा

शाहजहान याने दिल्ली येथे बांधलेली कोणती वास्तू प्रसिद्ध आहे ?

लाल किल्ला

संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

ज्ञानेश्वरी ( भावार्थदीपिका)

महाराष्ट्रात वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला ?

संत ज्ञानेश्वरांनी

कुमारसंभव हे महाकाव्य कोणी लिहिले ?

कालिदास

चरकसंहिता या ग्रंथाची रचना कोणी केली ?

चरक

समुद्रगुप्त कोणाचा भक्त होता ?

विष्णूचा

गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता ?

श्रीगुप्त

पुराणांची एकूण संख्या किती आहे ?

१८ पुराणे

 

No comments:

Post a Comment