ll काही प्रसिद्ध व्यक्तींचे उद्गार ll
माझे खरे मोठेपण मी मारलेल्या चाळीस लढायांत नसून मी तयार केलेल्या कायदा संहितेत आहे.
- नेपोलियन
रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती.
- नेपोलियन
तुम्हांस जर एक वर्षाची बेगमी करावयाची असेल तर धान्य पेरा ; शंभर वर्षाची बेगमी करावयाची असेल तर माणसे पेरा .- कर्मवीर भाऊराव पाटील
करा किंवा मरा.( Do or Die .)- महात्मा गांधी .
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच!
- लोकमान्य टिळक
लोकसंख्यावाढ हा राष्ट्राच्या प्रगतीतील फार मोठा अडसर आहे.
- रं.धो.कर्वे
जय जवान जय किसान .- लालबहादूर शास्त्री
सत्य आणि अहिंसा हाच माझा परमेश्वर . - महात्मा गांधी
लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या. - वि.दा.सावरकर
"तुम मुझे खून दो; मै तुम्हें आझादी दूँँगा l - नेताजी सुभाषचंद्र बोस
माझ्या रक्ताचा एक थेंब देशाचे स्वातंत्र्य आणि एकता यांचे रक्षण करील.- इंदिरा गांधी.
हिंदुत्व हि जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे,तितकीच ती अस्पृश्यांची आहे.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही!
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर
वेदांकडे परत चला . स्वामी दयानंद सरस्वती
घटनेतील मार्गदर्शक तत्वांचे पूर्णतः अनुपालन झाले तर भारत हा पृथ्वीवरील स्वर्ग होईल.
- न्या.एम. सी.छगला
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे! - लोकमान्य टिळक
पन्नास वर्षे ! ब्रिटिश राज्य तोवर टिकेल ना? स्वा. सावरकर
चलो दिल्ली! -सुभाषचंद्र बोस
चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा.
-दादाभाई नौरोजी
असे महापुरुष मरत नसतात, त्यांच्या कार्याच्या रूपाने ते अमर झालेले असतात.-महात्मा गांधी(टिळकांबद्दल हे उदगार काढले )
लोकमान्य टिळकांइतकीच शिक्षा मिळण्याचा मान मला मिळाला हा मी माझा बहुमान समजतो.
-महात्मा गांधी
मी भाकरी मागायला आलो आणि माझ्या पदरात दगड टाकले. महात्मा गांधी
भारत मुक्त झाला की मानवता मुक्त झालीच. - नेताजी सुभाषचंद्र बोस
जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी. महात्मा फुले
विद्येविना मती गेली l
मती विना नीती गेली l
नीतीविना गती गेली l
गतीविना वित्त गेले l
वित्ताविना शूद्र खचले l
इतके अनर्थ एका अविद्येने केले l
( शेतकऱ्यांचा आसूड)
शिका, संघटित व्हा,संघर्ष करा.
-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.
-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
इष्ट असेल ते बोलणार व शक्य असेल ते करणार.- गोपाळ गणेश आगरकर
भित्रे लोक त्यांच्या मरणापूर्वीच अनेक वेळा मारतात.
- शेक्सपियर
जय जवान जय किसान जय विज्ञान. -अटल बिहारी वाजपेयी
No comments:
Post a Comment