वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
1.डोळे दिपणे - आनंदाने डोळे चमकणे.
2.जाहीर करणे - सर्वांना सांगणे.
3. आभार मानणे- कृतज्ञता व्यक्त करणे, धन्यवाद देणे.
4. खजील होणे - शरम वाटणे.
5. आश्चर्यचकित होणे - नवल वाटणे.
6. मान्य करणे - कबूल करणे.
7. स्वैर हिंडणे - मोकाट फिरणे.
8. भक्ष्य मिळवणे - अन्न मिळवणे.
9. बाचाबाची होणे - शाब्दिक भांडण होणे.
10. मन मोहून टाकणे - मन गुंतून पडणे.
11. स्वाधीन करणे - देणे सुपूर्द करणे.
12. साह्य करणे - मदत करणे.
13. काया झिजवणे -
दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट करणे.
14. गौरव करणे - सन्मान करणे.
15. भान हरपणे - गुंग होणे.
16. सौजन्य दाखवणे -
चांगुलपणा दाखवणे.
17. आज्ञा पाळणे - आदेश मानणे.
18. वंदन करणे - नमस्कार करणे.
19. वेळ खर्च करणे -
वेळ सत्कारणी लावणे.
20. पसार होणे - पळून जाणे, निघून जाणे.
21. रंगून जाणे -
गुंग होणे, मग्न होणे, गर्क होणे.
22. पांगापांग होणे - गर्दी विरळ होणे.
23. भडीमार करणे - जोराचा मारा करणे.
24. बाजू घेणे - कड घेणे,म्हणणे पटणे.
25. हुशारी येणे - तरतरी येणे, बरे वाटणे.
26. तणतणणे - रागाने बडबडत जाणे.
27. अभिवादन करणे - नमस्कार करणे.
28. स्वागत करणे -
चांगल्या प्रकारे या म्हणणे.
29. मार्ग काढणे -
रस्ता काढणे बाहेर पडणे.
30. मलूल होणे - निस्तेज होणे कोमेजणे.
31. करुणा उत्पन्न होणे - दया उत्पन्न होणे.
32. अपशब्द वापरणे -
वाईट शब्द उच्चारणे.
33. सल्लामसलत करणे -
विचारविनिमय करणे.
34. दर्शन घेणे - पाहणे, भेटणे.
35. हात पाय हलवणे - काम करणे.
36. ऐट दाखवणे - रुबाब दाखवणे.
37. शरीर राबवणे - कष्ट करणे.
38. खांद्याला खांदा लावून काम करणे
- एकमेकांना सहकार्य करून काम करणे.
39.अभिमान वाटणे -
योग्य असा गर्व वाटणे.
40. निश्चय करणे - ठाम निर्धार करणे.
41. वसाहत करणे - वस्ती करणे.
42.धारण करणे - अंगीकारणे.
43.हौस असणे - आवड असणे.
44.नाद लागणे -
आवड निर्माण होणे, छंद जडणे.
45. हट्ट धरणे - हेका धरणे.
कौतूक वाटणे - अप्रूप वाटणे.
स्फूर्ती मिळणे - प्रेरणा मिळणे.
No comments:
Post a Comment