Tuesday, October 18, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच 10

 



इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा 
विषय - बुद्धिमत्ता 
घटक - समसंबंध 

समसंबंध - 
       समसंबंध म्हणजे समान संबंध .या प्रश्नप्रकारामध्ये एकूण 4 पदांचा संबंध येतो. 
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध असतो तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो.

    उदा.         गोवा : पणजी : : आसाम :   ?

          1)  रांची 
          2)  कोहिमा 
          3)  दिसपूर 
          4)  कोहिमा

उत्तर : आसाम : दिसपूर 

हा राज्य व त्यांच्या राजधान्या यांचा संबंध आहे.

या प्रश्नप्रकारामधून विद्यार्थ्यांची तर्कशक्ती,आकलन , निरीक्षण ,अचूकता ,सामान्य ज्ञान इ.गुण लक्षात येतात.
या प्रश्नप्रकारामध्ये शब्दसंग्रह,आकृत्या  आणि संख्या यावर प्रश्न विचारले जातात.

शब्दसंग्रह - या प्रश्नप्रकारामध्ये पहिल्या दोन पदांचा संबंध लक्षात घेऊन तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध काढताना हा संबंध समानार्थी ,विरुद्धार्थी,समूहदर्शक 
शब्द ,रंग,रूप,वैशिष्ट्ये ,गुणधर्म ,आकार ,चव ,स्वभाव ,कार्य ,स्थान,दर्जा, क्रिया ,उपयोग,विशिष्ट क्रम , आवाज,अवयव याबाबतीत असू शकतो.
विद्यार्थ्यांनी भूगोल,,सामान्य विज्ञान,परिसर अभ्यास या विषयांचा सखोल अभ्यास करावा.तसेच अवांतर वाचनही करावे.
महत्वाच्या ऑनलाईन टेस्टस - 
आपल्याला खाली विविध घटकावर आधारित ऑनलाईन टेस्टस सोडवण्यासाठी दिल्या आहेत.
खाली दिलेल्या निळ्या लिंक्सवर क्लिक करून आपण त्या सोडवू शकता.









Important Online Tests for 5th Standard Scholarship Exam.
Related Posts 











 










No comments:

Post a Comment