|
डॉ.ए.पी.जे.अब्दुल
कलाम यांचे प्रेरणादायी विचार
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भारताचे
लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन यांनी भारतातील तरुणांना नेहमीच
प्रेरित केले आहे. त्यांनी आपल्याला स्वप्नं बघायला आणि पूर्ण करायला शिकवले.या
व्हिडीओमध्ये आपण आपल्या मिसाईल मॅनचे 40 प्रेरणादायी विचार पाहूया.
स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता .
स्वप्नं तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत.
वाट बघणाऱ्यांना तेवढंच मिळते , जेवढं प्रयत्न करणारे सोडून
देतात.
ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलेल
त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झालात.
स्वप्नं खरं होण्याआधी तुम्हाला स्वप्नं बघावी लागतील.
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल.
तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही ;परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता.आणि तुमच्या सवयीच तुमचे उद्याचे
भविष्य बदलेल.
सवयी बदला आणि भविष्य बदलेल.
प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडतं.
काय माहित लोक राग करण्यासाठी वेळ कोठून काढतात?
जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊलखुणा
उमटवायच्या असतील तर एकच उपाय आहे; कधीच पाऊल मागे
घेऊ नका.
प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि
खऱ्या मनाने केलेले प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही.
आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता
रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.
आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता
रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.
एखाद्याला हसणे खूप सोपे आहे .
परंतु एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे.
काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काळ्या रंगाचा फळाच विध्यार्थ्यांचे आयुष्य,
त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवतो .
यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका . त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल .अपयशी लोकांचे चरित्र वाचा - त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील.
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली
नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत
नाही ;तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील;मालक नाही .
आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या
तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात ,त्या तर तुम्हाला तुमच्या मधील क्षमता आणि ताकदीची
ओळख करून देण्यासाठी येत असतात.म्हणून कठीण परिस्थितीला देखील कळू द्या की तुम्ही
देखील खूप कठीण आहात.
मी Handsome व्यक्ती नाही
आहे.पण मी माझे Hand गरजूंना मदत म्हणून देऊ शकतो.सुंदरता ही मनात
असते तोंडावर नाही .
कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते .कारण आज मी मागे वळून बघतो
तर माझे मार्क्स मला हसवत नाहीत
.मित्रांसोबतच्या घालवलेल्या आठवणी मला हसवतात.
दोन परिस्थितीमध्ये नेहमी शांत राहा .
एक - जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या
शब्दावरून तुमच्या भावना समजू शकणार नाहीत .
दोन - जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला तुम्ही
शब्दही न बोलता समजून घेईल .
जुने मित्र सोन्यासारखे असतात .नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात.जेव्हा तुम्हाला हिऱ्यासारखे मित्र भेटतील ,तेव्हा सोन्यासारख्या मित्रांना विसरू नका.कारण सोन्याची अंगठीच हिऱ्यांना पकडून
ठेऊ शकते.
प्रेम आंधळे असते ,हे खरे आहे. कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरु केले होते.
पहिल्या विजयानंतर थांबू नका.कारण दुसऱ्यांदा
अपयशी ठरलात तर तुमचं पहिलं यश नशिबाने मिळाले होते, हे म्हणण्यासाठी अनेकजण तयार असतात.
महान स्वप्नं पाहणाऱ्यांची महान स्वप्ने
नेहमीच पूर्ण होतात.
माणसाला समस्या ,अपयशाची आवश्यकता असते.कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते.
छोटे ध्येय ठेवणे अपराध आहे.तुमचं ध्येय नेहमी
मोठे असले पाहिजे.
तोपर्यंत लढणे थांबवू नका,जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही.
जीवनात एकच ध्येय ठेवा.सतत ज्ञानप्राप्त करत
राहा,कठोर मेहनत करा. महान जीवन मिळण्यासाठी नेहमी कार्यरत राहा.
जर आपण स्वतंत्र नसणार तर कोणीच आपला आदर
करणार नाही .
आकाशाकडे बघा.आपण एकटे नाही आहोत.संपूर्ण
ब्रम्हांड आपल्यासाठी अनुकूल आहे.
जे स्वप्नं
बघतात ,मेहनत करतात.त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ
देण्यासाठी ब्रम्हांड नेहमी तयार असते.
तरुणांना माझा संदेश आहे की , वेगळ्या पद्धतीने विचार करा.काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा.स्वतःचा
रस्ता स्वतः बनवा,आणि जे अशक्य आहे ते मिळवा.
तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही
एकाग्र होऊन ध्येयावर लक्ष द्यायला पाहिजे.
मला पूर्ण विश्वास आहे.ज्याने अपयशाची कडू
गोळी चाखलेली नसेल ,तो यशासाठी आवश्यक तेवढी महात्वाकांक्षा ठेऊ शकत नाही.
सर्वांकडे एकसमान Talent नसतो.परंतु Talent निर्माण
करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात.
सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका,कारण कधी कधी अनेक चाव्यातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते.
सक्रीय व्हा , जबाबदारी
घ्या!त्या गोष्टीवर काम करा,ज्यावर तुमचा विश्वास आहे.जर तुम्ही हे करत
नसाल ,तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांच्या हाती देत आहात .
अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि
परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे.
देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या
बेंचवर सापडतो.
यशाचे रहस्य काय ? योग्य निर्णय घेणे .
योग्य निर्णय कसे घ्यावे ? अनुभवाने
आणि अनुभव कसे घ्यावे ? चुकीचे निर्णय घेऊन .
इंग्रजी शब्द ‘END’ चा अर्थ ‘शेवट’
असा नसून ..
“Effort Never Dies” म्हणजेच
‘प्रयत्न कधीच वाया जात नाहीत’ असा होतो .
Fail चा अर्थ अपयश असा होत नाही.तर
‘First Attempt in Learning’
‘शिकण्यासाठी पहिला प्रयत्न’ असा होतो.
No comments:
Post a Comment