तरुणाईचे प्रेरणास्थान ए.पी.जे.अब्दुल कलाम A.P.J.Abdul Kalam Speech
'माझ्या स्वप्नातील भारत' या पुस्तकाचे लिखाण करून २०२० साली 'माझ्या कल्पनेतील भारत कसा असेल ? अशी संकल्पना सर्वसामान्य जनतेसमोर मांडणारे , 'या देशातील तरुणाईच्या उर्जेतून देशाचा विकास होऊ शकतो'ही संकल्पना ज्या महान व्यक्तीने आपल्यासमोर मांडली ,त्या व्यक्तीचे नाव आहे 'ए.पी.जे.अब्दुल कलाम'.
कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमध्ये झाला.त्यांचे पूर्ण नाव 'अबुल पाकिर जैनुल्लब्दिन अब्दुल कलाम असे होय.रामेश्वरजवळ एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला.वडिलांचा होडीचा व्यवसाय.आपला मुलगा शिकून मोठा व्हावा , ही प्रबळ इच्छा त्यांच्या वडिलांची होती.लहानपणापासून कलाम अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होते.गणित आणि विज्ञानाची त्यांना प्रचंड आवड होती.याच दोन विषयांच्या प्रेमाने त्यांना त्यांचे नाव जागतिक किर्तीपर्यंत पोहचवता आले.
प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम मद्रास इन्स्टिट्यूट सेन्ट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथे झाले. 1958 ते 1961 या कालखंडामध्ये राष्ट्रीय संरक्षण संस्था या ठिकाणी काम केले. शालेय जीवनामध्ये वर्तमानपत्रे विकली.आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'कमवा आणि शिका' या मार्गाचा स्वीकार केला. विक्रम साराभाई यांचे ते शिष्य होते.अमेरिकेमध्ये नासा या संशोधन संस्थेमध्ये 4 महिने प्रशिक्षण घेतले.
आपल्या देशाचा विकास करायचा असेल आणि शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने सक्षम बनायचे असेल तर त्यासाठी स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार केली पाहिजेत ,ही भूमिका कलाम सरांची होती.त्याच दृष्टीने त्यांनी संशोधनास सुरुवात केली.त्यांच्या प्रयत्नांना यश आले.स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार केले.
कलाम सरांचे विज्ञान क्षेत्रातले ज्ञान पाहून ,संशोधनातील दृष्टी पाहून त्यांच्यामध्ये असणारा उत्तम संशोधक ,प्रखर राष्ट्रभक्ती असणारा माणूस पाहून त्यांच्या कर्तृत्वाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने 1994 साली त्यांना भारताचा सर्वोच्च 'भारतरत्न' हा पुरस्कार प्रदान केला.
आयुष्यामध्ये शाकाहारी आणि अविवाहित असणऱ्या या महामानवाने देशातील सर्व तरुणांसमोर एक आदर्श विचार मांडण्याचे कार्य केले.देशभरातून कार्यक्रम ,व्याख्यानाच्या माध्यमातून फिरत असताना ,उपदेश करताना सर नेहमी सांगत ," देशाची पिढी युवा शक्तीच्या कर्तृत्वातून घडत असते.तुमचे हात देशाच्या विकासासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या कमी लावा.प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करावी .
अशी माणसे जेव्हा देशाच्या मातीत निर्माण होतात, तेव्हाच पाय जमिनीवरती ठेऊन आकाशाला गवसणी घालणाऱ्या पिढ्या निर्माण होत असतात,तेव्हाच देशाचा विकास होत असतो.
आपल्याला देशाचा विकास करायचा असेल व देशाला महासत्ता बनवायचे असेल तर आपण कृतीशील विचारांची जोड दिली पाहिजे.हेच विचार कलाम सरांनी माणसांच्या मनावरती बिंबवण्याचे काम केले.कलाम सरांचे हे काम पाहून देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून 2002 ते 2007 या कालखंडात त्यांची निवड झाली.
देशातल्या लोकांना स्वप्ने दाखवणारा ,स्वप्नपूर्तीसाठी विचार रुजवणारा एक ध्येयवादी व्यक्ती म्हणून कलामसरांचा उल्लेख केला जातो.देशाच्या विकासासाठी शेतीबरोबर तंत्रज्ञान ,मातीबरोबर माणुसकी ,शिक्षणाबरोबर सहकाराच्या प्रगतीला गवसणी घालणारी पिढी जेव्हा निर्माण होईल तेव्हाच भारत महासत्ता बनेल .
सामान्य कुटुंबातील तरुण ,संशोधक ,शास्त्रज्ञ ते देशाचे राष्ट्रपती.पिढी घडवणारा ,घडविण्याचे संस्कार देणारे किमयागार म्हणजेच ए.पी.जे.अब्दुल कलाम होय !
संबंधित पोस्ट्स -
ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार .
No comments:
Post a Comment