Tuesday, October 11, 2022

स्त्रिया व पुरुष यांच्या आवाजात फरक का आहे ?


जिज्ञासा 

 स्त्रिया व पुरुष यांच्या आवाजात फरक का आहे ? 

स्त्री व पुरुष यांच्या आवाजात फरक आढळतो .कारण त्यांच्या स्वरयंत्रात फरक असतो.घशाजवळ असणाऱ्या फुगीर स्वरयंत्रात स्नायूंचे उभे व आडवे तंतू असतात.त्यांना स्वरतंतू म्हणतात.आपण उच्छवासावाटे हवा बाहेर टाकतो तेव्हा या हवेमुळे स्वरतंतू कंप पावतात व त्यामुळे ध्वनी निर्माण होतो.जीभ,ओठ, टाळू व दात यांच्या सहाय्याने मग या ध्वनीतून आपण शब्द निर्माण करतो.पुरुष व स्त्रिया यांच्या स्वरयंत्रातील या स्वरतंतुमध्ये असा फरक असतो.पुरुषांचे स्वरतंतू हे जाडसर व आखूड असतात.त्यामुळे त्यांचा आवाज हा अधिक जाडाभरडा असतो.त्याची कंपनसंख्या कमी असते.स्त्रियांमध्ये हे स्वरतंतू पातळ व लांब असतात,त्यामुळे स्त्रियांचा आवाज पातळ व बारीक होतो.तसेच त्यांची कंपनसंख्या अधिक असते. 

No comments:

Post a Comment