डोळ्यांभोवती काळी वर्तुळे का उमटतात?
आपल्या चेहऱ्याच्या त्वचेखाली मेद पेशींचा एक पातळ थर असतो. यात स्निग्ध पदार्थ असतात. या थरात पुरेसे स्निग्ध पदार्थ असले तर त्वचा मऊ व तजेलदार दिसते. परंतु जागरण किंवा अधिक मानसिक तणावाखाली माणूस दीर्घकाळ राहतो तेव्हा तणावामुळे या स्निग्ध पदार्थांचे अपघटन होते. त्यामुळे त्वचेवर असणारा ताण कमी होतो व ती सैल होते. तसेच अपुरे पोषण यामुळेही आपल्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळे उमटतात.
No comments:
Post a Comment