Tuesday, October 18, 2022

माहे ऑक्टोबर 22च्या वेतनाबाबत आजचा महत्वाचा शासननिर्णय




माहे ऑक्टोबर, २०२२ चे माहे नोव्हेंबर, २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत.......


महाराष्ट्र शासन वित्त विभाग


शासन परिपत्रक क्रमांका संकीर्ण २०२२/प्र.क्र.११२/ कोषा-प्रशा ५ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

तारीख: १८ ऑक्टोबर २०२२

संदर्भ : शासन निर्णय क्रमांक: डिडियो-१००५/प्र.७५/षा प्र.५. दि.२९.०८.२००५


शासन परिपत्रक:

दिवाळी सणाची सुरुवात यावर्षी दि. २२ ऑक्टोबर २०२२ पासून होत आहे. राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांना दिवाळी सण साजरा करताना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये याउद्देशाने माहे ऑक्टोबर २०२२ चे माहे नोव्हेंबर २०२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


2. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयातील परिच्छेद १९८० मधील तरतूद शिथील करून माहे ऑक्टोबर २०२२ या महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतनाचे प्रदान दि. २१ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.


3. यादृष्टीने मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम ७१ च्या तरतुदी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ च्या खंड १ मधील नियम क्र. ३२८ मधील तरतुदी देखील शिथिल करण्यात येत आहेत. ४. वेतन देयकाचे प्रदान विहित कालावधीत होण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी वेतन देयके त्वरीत कोषागारात सादर करावीत


4. सदर तरतूदी जिल्हा परिषद, मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे/अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी/कर्मचारी, तसेच निवृतवेतनधारक यांना देखील लागू होतील.


६. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारे यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या aharashtra.gov.in या


संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२२१०१८१३५९२८४००५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

INDRAJEET SAMBHAJI GORE

इंद्रजित गोरे

शासनाचे उपसचिव

No comments:

Post a Comment