Tuesday, October 25, 2022

प्रभावी सूत्रसंचालनासाठी कविता व चारोळ्या


मुक्या जीवांचे दुःख 

कोरडे जे शेत आहे 
ओलित झाले पाहिजे 
मुक्या जीवांचे दुःख ह्या 
बोलीत आले पाहिजे  .... ( धृ .)

छते उन्हाची घराला 
नांदते जीव पोळती 
फुफाट्याच्या वाहणा 
पायामाधुनी घालती 
दाह त्यांच्या वेदनांचे 
झेलित गेले पाहिजे ..... (१) 

आभाळ अंतरातले 
सोसताना फाटलेले 
अश्रु दो डोळ्यातले 
गळताना दाटलेले 
महापुरांना बांध ह्या 
घालीत गेले पाहिजे .... (२) 

नांगरल्या  शेतापरी 
काळीज दुःख साहते 
तरी सुगीचे डोलत्या 
स्वप्न हिरवे पाहते 
अर्थ ह्या स्वप्नातही 
पेरीत गेले पाहिजे 
मुक्या जीवांचे दुःख ह्या 
बोलीत आले पाहिजे ... ( ३) 


-----------------------------------------------------------------------------------------------


ज्यांची बाग फुलून आली ...

ज्यांची बाग फुलून आली , 
त्यांनी दोन फुले द्यावीत 
ज्यांचे सूर जुळून आले, 
त्यांनी दोन गाणी द्यावीत 

सूर्यकुलाशी ज्यांचे नाते,
त्यांनी थोडा उजेड द्यावा 
युगायुगांचा अंधार जेथे ,
पहाटेचा गाव न्यावा .

ज्यांच्या अंगणी ढग झुकले ,
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे .
आपले श्रीमंत हृदय त्यांनी ,
रिते करून भरून घ्यावे .

आभाळाएवढी ज्यांची उंची ,
त्यांनी थोडेसे खाली यावे .
मातीत ज्यांचे जन्म मळले ,
त्यांना वरती उचलून घ्यावे .

( दत्ता हलसगीकर )
गणेश तात्याराव हलसगीकर 
------------------------------------------------


      प्रेरणादायी कविता 




ढाळू नकोस अश्रु , पुसणार नाही कोणी 
दुःखात साथ द्याया ,असणार नाही कोणी ..
जीवनास फुलवण्याचे जरि मार्ग खुंटले रे 
तुझ्याच दैवताने जरि तुझ लुटले रे ..
तरी साक्ष द्यावयाला , मिळणार नाही कोणी .....ll १ ll 
मिटती न दैवरेखा , वाहुनि आसवांना 
सुटती न दैव रेखा , भिउनी यातनांना 
ती हाक यातनेची ना ऐकणार कोणी .... ll २ ll 
स्वार्थी जगात वेड्या , मिळणार काय आहे ? 
तो देवही भुकेला , नैवेद्य शोधताहे 
पदरात दान तुझ्या , देणार नाही कोणी 
दुःखात साथ द्याया , असणार नाही कोणी .. ll ३ ll 

-----------------------------------------------------------









नमस्कार ,

या लेखामध्ये आपण प्रभावी सूत्रसंचालनासाठी विविध कवी/कवयित्री यांच्या प्रभावी कवितांच्या ओळी ,विविध लेखक ,विचारवंत ,समाजसुधारक यांचे विविध विषयावरील  प्रभावशाली विचार आपण पाहणार आहोत.




प्रभावी सूत्रसंचालनासाठी कविता व चारोळ्या  


जीवनगाणे 

आपण एक थेंब व्हावं ,

की काळाच्याही पटलामधून 

झरता आलं पाहिजे .

आपण एक कोंब व्हावं ;

की जगण्याचाही मातीमधून 

स्फुरता आलं पाहिजे !


मला वाटतं जगणं फक्त 

त्यालाच जमून जातं ,

झरा होऊन अवखळपणे 

ज्याला वाहता येतं .

काय म्हणून सुखासाठी 

गाऱ्हाणी घेऊन बसायचं ;

दुःख आलं त्याच्या सोबत 

गाणी म्हणत हसायचं !

वसंत होऊन मनात 

शिशिर झेलता आलं पाहिजे ,

बाण सोडायचा आहे ना दूर ,

तर जवळचं धनुष्य पेलता आलं पाहिजे .

मला वाटतं जगणं फक्त 

त्यालाच जमून जातं ,

झरा होऊन अवखळपणे 

ज्याला वाहता येतं .

जगणं म्हणजे स्वतःलाच 

पेरून उगवलं पाहिजे ;

आपलं झाड आहे 

आपणच जगवलं पाहिजे !

जगणं म्हणजे झुरणं नाही ,झरणं असतं

जगणं म्हणजे मरणं नाही ,मुरणं असतं !

मुक्त मुक्त होऊन ज्याला 
अविरतपणे झरता येईल 
उंच उंच वाढविण्यासाठी 
खोल खोल मुरता येईल .

मला वाटतं जगणं फक्त 

त्यालाच जमून जातं ,

झरा होऊन अवखळपणे 

ज्याला वाहता येतं .

------------------------------------------------------


जसा येणार बहर,तसा जाणार झडून 

गळणाऱ्या पानासाठी ,काय फायदा रडून ,

काय फायदा रडून ,जिणं हसत जगावं 

अन मातीच्या कुशीत सोनं होऊन मरावं  

---------------------------------------------------------


टेढमेढी राहो पर तू ,धीरे धीरे चलना सीख 

चांद जैसा शीतल बन और

 सूरज जैसा जलना सीख 

काटों के संग  रहकर भी तू 

फुलों जैसा खिलना सीख 

मिट्टी का तू है पुतला 

तो हर सांचे में जलना सीख

--------------------------------------------------------- 


कवयित्री बहिणाबाई 

घरची अस्तुरी जसा हळदीचा गाभा ,

पराया नारीसाठी पुरुष गल्लीवरी उभा 

घरची अस्तुरी जसं कापसाचं बोंड ,

पराया नारीसाठी धुतो गल्लीवरी तोंड .

-------------------------------------------------------


वरचा वळ असो की आतली कळ 

आईकडून घ्यावं सोसण्याचं बळ .

----------------------------------------------------------


बेटा -बेटी 


बेटा वारीस है,

तो बेटी पारस है 

बेटा वंश है ,बेटी अंश है 

बेटा आन है,बेटी शान है 

बेटा  तन है ,बेटी मन है

बेटा मान है,बेटी गुमान है 

बेटा संस्कार है,बेटी संस्कृती है 

बेटा आग है,बेटी भाग है 

बेटा दवा है,बेटी दुआ  है 

बेटा भाग्य है,बेटी विधाता है 

बेटा शब्द है,बेटी अर्थ है 

बेटा गीत है,बेटी संगीत है

 बेटा प्रेम है, बेटी पूजा है 

---------------------------------------------------------


'लेक वाचवा - लेक शिकवा' प्रास्ताविक 

वंशाला दिपक हवा म्हणणारे आपण वंशाची पूर्तता या मुलींमध्ये असते हेच विसरून जातो.मुलगा किंवा मुलगी याही आधी एक माणूस म्हणून पाहायचं विसरतो .सोनुल्या लेकीला,गोड बहिणीला ,प्रेमळ प्रेमिकेला ,लाडक्या बायकोला ,आदरणीय आईला आणि या सत्यात सामावणाऱ्या स्त्री शक्तीला विसरून जातो.आई-वडिलांच्या उबदार पंखाखाली वाढणारी सोनुली वास्तवाच्या जगात गेल्यावर तिला आपल्यासारखा त्रास नको म्हणून तिचं येणंच नाकारतो .

   'कायम रडणारी बाहुली'  असं हिणवून घेणारी छकुली ,तिला तिचं विश्व सोडून नव्या जगात सामावायचं असतं याची जाणीव घेऊन जगत असते .छोटीशी सुंदर परी प्रत्येकाच्याच अंगणात खेळायला हवी बागडायला हवी .

----------------------------------------------------------

आयुष्यात कोण येणार ,ही वेळ ठरवते 

आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे .हे हृदय ठरवते 

पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो .


ज्याला चेतना असतात ,त्याला वेदना होतात ,

अन ज्याला भावना असतात ,त्यालाच यातना होतात.


'साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श व्हावा ,

उजेडाचे दान देण्या ,झोपडीत सूर्य यावा ,

नको असा एक हात ,जो पाटीला पारखा ,

पुस्तकाला स्पर्श व्हावा ,त्याच्या आईसारखा .

-------------------------------------------------------------

कविता - थोडं जगून बघ

जन्माला आला आहेस ,थोडं जागून बघ ,

जीवनात दुःख खूप आहे ,थोडं सोसून बघ 

चिमुटभर दुःखानं कोसळू नकोस ,

दुःखाचे पहाड चढून बघ 

अपयश येतं,निरखून बघ डाव मांडणं सोपं असतं 

थोडं खेळून बघ 

घरटं बांधणं सोपं असतं ,थोडी मेहनत करून बघ 

जगणं कठीण मरणं सोपं असतं 

दोन्हीतल्या वेदना झेलून बघ 

जिणं -मरणं एक कोडं असतं ,

जाता जाता एवढं सोडवून बघ .

-----------------------------------------------------------

कवी यशवंत 

या मातीच्या कणाकणातून ,

तुझ्या स्फूर्तीची फुल्तीला सुमने 

जोवर भाषा असे मराठी ,

यशवंताची घुमतील कवणे 

हिमालयावर येत घाला ,

सह्यगिरी हा धावून गेला 

मराठमोळ्या पराक्रमाने, 

दिला दिलासा इतिहासाला .

--------------------------------------------------------------

If you salute your duty ,

You no need to salute anybody .

But.....

If You pollute your duty ..

You have to salute Everybody .

    - Abdul Kalam 


--------------------------------------------------------------

शिक्षणाबद्दल महात्मा गांधी यांचे विचार:


केवळ अक्षरओळख हा शिक्षणाचा अर्थ नाही.

अक्षरओळख हे शिक्षणाचे केवळ साधन आहे .मन लावून आपल्या सर्व इंद्रियाकडून उत्तम काम करवून घेण्याचे सामर्थ्य बालकाला येणे , हा शिक्षणाचा खरा अर्थ.

उपदेशापेक्षा उदाहरणांचा प्रभाव मुलांवर अधिक पडतो.तुमचे आचार -विचार ,तुमचा उत्साह ,तुमची आनंदी वृत्ती मुले नकळत आत्मसात करतात.

--------------------------------------------------------------

खरे शिक्षण -

इच्छाशक्तीचा प्रवाह  आणि अभिव्यक्ती आपल्या स्वतःच्या ताब्यात ज्यामुळे येतात,ते खरे शिक्षण .

योग्य वळण , सुसंस्कार देणारे ,मनोधैर्य वाढविणारे , स्वावलंबी बनवणारे असते ते खरे शिक्षण.

विचारांना कृतीची जोड देते ,ते खरे शिक्षण.

सांस्कृतिक परंपरांचे जतन करते , ते खरे शिक्षण .

मानवता,समता जपते ,ते खरे शिक्षण .

वैज्ञानिक झेप घेते , ते खरे शिक्षण .

नैतिकतेचा परिपोष करते ,ते खरे शिक्षण .


--------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment