Sunday, October 23, 2022

पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Jawaharlal Nehru



पंडित जवाहरलाल नेहरू

 Pandit Jawaharlal Nehru 

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ,मुलांचे आवडते चाचा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस.त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि बालदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित असलेले अध्यक्ष महाशय माननीय ....... सर प्रमुख पाहुणे ..... सर आमचे सर्व गुरुजन वर्ग ,समोर उपस्थित असलेले श्रोते आणि माझ्या बालमित्रांनो ......

     ना सुकला गुलाब 

कधीच त्यांच्या रसिकतेचा ,

फुलासारखे जपत मुलांना 

घेतला ध्यास त्यांनी विकासाचा ........

झोकून दिला देह देशासाठी ..

विचार मनात फक्त स्वातंत्र्याचा....

मित्रहो ,मी कुणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलेच असेल .अहो इंग्रजांच्या वाईट व जाचक हुकुमशाहीचा बिमोड करण्यासाठी अनेकांना लढा द्यावा लागला.असेच एक महान ,थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू.गांधीजींसोबत अहिंसेच्या मार्गाने इंग्रज सरकारला धारेवर धरणारे हे थोर नेते.पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं ,की प्रथम आठवतात ती गुलाबाची फुलं आणि गुलाबाच्या फुलांप्रमाणे गोंडस आणि निरागस मुलं!नेहरुंना गुलाबाची फुलं आणि फुलांसारखी निरागस मुलं फार आवडत असत.देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून मुलांकडे ते मोठ्या आशेने पाहत असत.देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे,त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ,असा त्यांचा ध्यास असायचा.14 नोव्हेंबर 1889 रोजी जन्मलेल्या पंडित नेहरूंनी आपले संपूर्ण आयुष्य देश स्वतंत्र करण्यासाठी आणि स्वतंत्र झालेल्या देशाला प्रगत बनवण्यासाठी खर्ची घातले.

           देश स्वतंत्र करण्यासाठी सत्याग्रह ,अहिंसा ,स्वदेशी,असहकार या मार्गांचा उपयोग करून त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला.'सायमन गो बॅक'  म्हणत कॉंग्रेसने सायमन कमिशनला विरोध करत निदर्शने केली.यात पंडित नेहरूही सामील होते.या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पंडितजी जखमी झाले.1942 मधील 'चलेजाव आंदोलनात' त्यांनी इंग्रजांना पळताभुई थोडी केली.स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेली भारतीय जनता पाहून इंग्रजांचे धाबे दणाणले .या आंदोलनातील अनेकांना त्यात्यानी तुरुंगात टाकले.पंडित नेहरू तुरुंगात अडकले .देशहिताची कामे करणे अवघड झाले;परंतु ते डगमगले नाहीत.आमचे काहीही होवो;पण तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे कार्य सुरु ठेवा,असा सल्ला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला.तुरुंगात असताना स्वस्थ न बसता त्यांनी लेखन केले.भारताच्या इतिहासावरील एक मोठा 'शोधग्रंथ' त्यांनी लिहिला.या ग्रंथाचे नाव होते 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'.

नेहरू तुरुंगातून सुटले.स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र झाला.स्वातंत्र्याचे महत्व जनतेला पटले होते.या गोऱ्या इंग्रजांना येथून हाकलून द्यायचेच , या एकमेव निर्धाराने जनता पेटून उठली होती.पंडित नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्याचा मांडलेला ठराव मंजूर करून घेण्यात आला .भारतीय जनतेचा रोष पाहता इंग्रजांना आता माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

15 ऑगस्ट 19 47 साली भारत स्वतंत्र झाला.पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.स्वतंत्र भारताच्या अनेक समस्या म्हणजेच अज्ञान,बेकारी ,दुष्काळ अशा अनेक प्रश्नांची त्यांनी योग्यप्रकारे हाताळणी करत देशाची वैज्ञानिक प्रगती केली आणि शेतीचा विकास घडवून आणला.

त्यांच्या उदंड कार्याची दाखल घेत 1952 साली त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मित्रांनो या थोर नेत्याने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले.27 मे 1964 रोजी ते आपल्यातून निघून गेले.खरे तर आपण आपल्या जीवनात देशहिताचे कार्य करणे ,देशबांधवांच्या हितासाठी कार्यरत राहणे आणि देशाला प्रगतशील बनविण्यात हातभार लावणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल ! 

जय हिंद ,जय भारत ! 







Related Posts

विविध विषयांवरील मराठी भाषणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


तरुणाईचे प्रेरणास्थान : ए.पी.जे.अब्दुल कलाम


वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व 

 

वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व  Importance of Reading


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय 

 

शहीद भगतसिंग माहितीपट


महात्मा गांधी मराठी भाषण


लाल बहादूरशास्त्री भाषण


महात्मा गांधी मराठी भाषण


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय १


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय २

14 नोव्हेंबर -बालदिन विशेष माहितीपट - पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य 


शिक्षकदिन मराठी भाषण


कर्मवीर भाऊराव पाटील मराठी भाषण


सुप्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उद्गार


डॉ.एन.डी.पाटील परिचय


सावित्रीबाई फुले मराठी भाषण


महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार


लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज


छत्रपती शिवाजी महाराज


मराठी राजभाषा दिवस 



















No comments:

Post a Comment