महाराष्ट्र शासन
ग्रामविकास विभाग
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ,
फोर्ट, मुंबई- ४००००१.
दूरध्वनी क्र. ०२२-२२०१ ७१०३
E-Mail- est14-rdd@mah.gov.in
क्रमांक. जिपव- २०२२/ प्र.क्र.२९/आस्था-१४
प्रति,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
दिनांक २०
ऑक्टोबर २०२२.
विषय: सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या
जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक.
संदर्भ : १) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिप - ४८२० /प्र.क्र.२९० / आस्था. १४.
दिनांक ०७.०४.२०२१.
२) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव-४८२०/प्र.क्र.२९० /आस्था.१४,
दिनांक ०४.०५.२०२२. ३) ग्रामविकास विभाग, शासन निर्णय क्र. जिपव- २०२२/प्र.क्र. २९/आस्था.१४. दिनांक २९.०६.२०२२.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र. १ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे.
सन २०२२ मध्ये होणान्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून, २०२२ पर्यंत करण्यास संदर्भ क्र. २ येथील दिनांक ४.५.२०२२ च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र. ३ येथील दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. उक्त दिनांक ४,५.२०२२ व दिनांक २९.६.२०२२ च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही
फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील. आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत
बदल्यांबाबत खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment