Thursday, November 3, 2022

तुलसीविवाह मराठी कथा

 


तुलसीविवाहासाठी मंगलाष्टके 

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं,मोरेश्वरं सिद्धीदं |

बल्लाळो मुरुडं विनायकमहं , चिन्तामणि स्थेवरं |

लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् |

ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || ||



गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा ।

कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।।

क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी ।

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।।


लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: ।

गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।।

अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे ।

रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।।

 

राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी ।

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।।

आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे ।

रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।।

 

लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी ।

रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।।

दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा ।

धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।।


लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण ।

साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।।

सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल ।

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।।

 

विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी ।

सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता ।

तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।।


आली लग्नघडी समीप नवरा घेउनी यावा घरा 

 गृहयोत्के  मधुपर्कपूजन करा ,अन्तःपटाते धरा 

दृष्टादृष्ट वधुवरा न करितां ,दोघे करावी उभी |

वाजंत्रे बहु गलबला न करणे,लक्ष्मीपते मंगलम ||||


तुलसीविवाह मराठी कथा 

प्राचीन काळी जालंधर नावाचा राक्षस चोहीकडे खूप उत्पात करत होता.राक्षस वीर आणि पराक्रमी होता.त्याच्या साहसी असण्यामागे कारण होते त्याची पत्नी वृंदा हिचा पतिव्रता धर्म.तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता.परंतु जालंधराच्या या उपद्रवामुळे सर्व त्रस्त देवगण प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले.त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचा पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला.इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधरचा मृत्यू झाला.वृंदाच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तिने क्रोधीत होऊन प्रभू विष्णूंना शाप दिला की,ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पतिवियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल.असे म्हणत वृंदा पतीसोबत सती गेली.ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे झाड उत्पन्न झाले.

इतर एका आख्यायिकेप्रमाणे : - 

वृंदाने रागात शाप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल.त्या दगडाला शालिग्राम म्हणतात.तेव्हा विष्णू म्हणाले की , हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील.माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल.तेव्हापासून तुळशीविना शालिग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते.शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीचा प्रतीकात्मक विवाह आहे.


No comments:

Post a Comment