Tuesday, December 27, 2022

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन

                                                    



प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन भाषण 

                     15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचा युनियन जॅक दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून उतरला. भारताचा तिरंगा अगदी डौलानं, अभिमानाने फडकायला लागला .त्याच वेळी या देशातल्या बुद्धिजीवी, विद्वान लोकांनी एकत्र येऊन एका घटनेची निर्मिती केली. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला घटना अर्पण केली. या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व अशा असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन ही घटना देशाला समर्पित केली.

     स्वातंत्र्य, समता, न्यायव्यवस्था ,समाजव्यवस्था या मूलभूत विचारांवर ती घटना देशाला अर्पण केलेली आहे. यामुळे हे राज्य प्रजासत्ताक म्हणून पाहिले जाते. 'प्रजेचे राज्य ,रयतेचे राज्य' अशी संकल्पना आपणास पहावयास मिळते.  देशातील सर्व व्यक्तींना कोठेही राहण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याच पद्धतीने मूलभूत हक्कांचा, कर्तव्याचा, कार्याचा अधिकार प्रत्येक भारतीयास अर्पण करण्यात आला.

                    घटना अर्पण करत असताना या देशांमध्ये सर्व व्यक्तींना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत .हा देश लोकशाहीचा स्वीकार करून लोकांचा विकास करणारा देश आहे. हेच प्रजासत्ताक राष्ट्रांवरून आपणास पहावयास मिळते. आपण सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समतेचे ,स्वातंत्र्याचे, समानतेचे विचार आत्मसात करून लोकांना ते स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. 

           'प्रजासत्ताक दिन' हा प्रजेच्या हक्काचे ,कार्याचे, मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी प्रजेच्या कल्याणकारी गोष्टींची जाणीव करून त्याच दिशेने घटनेचा सन्मान करून वाटचाल करणे गरजेचे आहे.

      आपण भारतीय या नात्याने प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्या घटनेचा सन्मान करून, आदरपूर्वक स्वीकार गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या कार्यांचा आदर्श घेऊन घटनेचा सन्मान करून प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्यासाठी 26 जानेवारी या दिनाच्या निमित्ताने प्रजेच्या कल्याणासाठी ,प्रजेच्या रक्षणासाठी ,देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी प्रयत्न करूयात ! 

 धन्यवाद!

No comments:

Post a Comment