Thursday, December 22, 2022

नाताळ ख्रिसमस मराठी निबंध

 




माझा आवडता सण नाताळ 

मराठी निबंध नाताळ 

ख्रिसमस मराठी निबंध

मित्रांनो, आपल्याला सणाच्या निमित्ताने सुट्टी मिळते ; त्यामुळे आपल्याला सण खूप आवडतात.दिवाळीत मोठी सुट्टी असते, तशीच नाताळातही असते.त्यामुळे आपण नाताळच्या सुट्टीची वाट बघत असतो.नाताळ हा ख्रिश्चनांचा सण आहे. आपला भारत देश सर्वधर्मसमभाव मानणारा देश आहे; त्यामुळे ख्रिश्चन लोक हेदेखील आपले बांधव आहेत.सर्वांनी प्रत्येक धर्माच्या सणाचा आदर केला पाहिजे.त्यांच्या सणाबद्दलही आदर केला पाहिजे.त्यांच्या सणाबद्दलही जाणून घेतले पाहिजे.



  आज मी तुम्हाला ' नाताळ ' या सणाबद्दल माहिती सांगणार आहे. डिसेंबर महिन्यात येणारा हा सण . २५ डिसेंबर हा प्रभू येशूचा जन्मदिवस.याच दिवशी येशूने योहानाकडून बाप्तिस्मा घेतला; म्हणून या दिवशी संध्याकाळी सर्व ख्रिश्चन लोक चर्चमध्ये जातात. त्याला ' ख्रिसमस ईव्ह ' असे म्हणतात.त्या संध्याकाळी चर्चमध्ये जाऊन गाणी म्हणतात.त्या गाण्यांना ' ख्रिसमस कॅरोल्स ' म्हणतात. रात्री बारा वाजता चर्चची घंटा वाजवतात.घरात फरच्या झाडाचा ख्रिसमस ट्री तयार करतात.या झाडाला वेगवेगळ्या वस्तू बांधतात.ह्या वस्तू लहान मुलांना दिल्या जातात.अशी कल्पना केली जाते की , ' सांताक्लॉज ' लहान मुलांना वस्तू भेट म्हणून देतात.लहान मुले त्या दिवशी खूप खुश होतात.



        'गुड फ्रायडे ' या दिवशी प्रभू येशूचे निधन झाले. लोकांचा उद्धार व्हावा, यासाठी येशूने मरण पत्करले, म्हणून या दिवसापासून हा दिवस ' शुभ शुक्रवार' म्हणून ओळखला जातो.येशूची शिकवण ही लोकांचा उद्धार करणारी होती.त्यांनी जे सांगितले , ते कृतीत आणले.त्यांनी इतरांची दुःखे स्वतः सहन करून इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न केला; म्हणूनच येशूचे वधस्तंभावरचे मरण हे लोकांचा उद्धार करणारे ठरले. 



    हा सण आनंदोत्सव साजरा करणारा असतो.लोक एकत्र येऊन खाणे-पिणे, नृत्य या माध्यमातून आनंद व्यक्त करतात, एकमेकांना भेटवस्तू देतात आणि शुभेच्छा संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा देतात. 

  सण कोणताही असो , तो आनंद घेऊनच येतो नि सर्वांना आनंद देतो.  

No comments:

Post a Comment