Thursday, December 29, 2022

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान





छोटे भाषण

माझा भारत महान


मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे.माझा भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता.

      भारतात भौगोलिक विविधता आहे.भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्य,फळे, भाज्या, फुले यांच्यात ही विविधता आढळते.

       भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे तसाच तो संतांचाही देश आहे.भारतात विविध धर्मांचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात.या सर्व भाषातील साहित्य समृद्ध आहे.

         भारताने 150 वर्षे गुलामगिरीत साहिली.तेव्हा एकजूट करून भारतीयांनी लढा दिला व 1947 साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यावर मात करतात.

      मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे.त्यामुळे भारत विविध क्षेत्रात सतत प्रगती साधत आहे. आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी आहे. औद्योगिक, वैज्ञानिक क्षेत्रात जगात अग्रेसर बनला आहे. माझा भारत खरोखर महान आहे.

जय हिंद! जय भारत!

No comments:

Post a Comment