Thursday, January 5, 2023

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त वाक्प्रचार व त्यांचे अर्थ.  आपल्याला ही माहिती नक्की आवडेल.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :-

परवानगी मिळणे - मोकळीक मिळणे, सवलत मिळणे.

शाळा बुडवणे - शाळेला दांडी मारणे.

नवल वाटणे - आश्चर्य वाटणे.

खोडी उलटणे - आपण केलेली खोडी अंगाशी येणे.

बदला घेणे - वचपा काढणे.

निर्धार करणे - ठाम निश्चय करणे.

भूमिगत होणे - लपून राहणे.

अटक करणे - कैद करणे.

बाळकडू मिळणे - लहानपणापासून संस्कार होणे.

प्रभाव असणे - ठसा असणे, छाप पडणे.

सुगावा लागणे - माग मिळणे, पत्ता कळणे.

पाळत ठेवणे -मुद्दाम नजर ठेवणे.

दीक्षा मिळणे - संस्कार मिळणे.

अवगत होणे - माहित होणे.

सहभाग घेणे - सामील होणे.

स्थापन करणे - निर्माण करणे, स्थायी स्वरूप देणे.

धमाकावणे -धमकी देणे.

प्रोत्साहित करणे - उत्तेजन देणे.

अवलंब करणे - अंगीकारणे, स्वीकारणे.

प्रत्यय येणे - अनुभवास येणे.

प्रणांची आहुती देणे - बलिदान करणे.

अजरामर होणे - कायम स्मरणात राहणे.

अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे.

कपाळाला आठ्या घालणे - नाराजी व्यक्त करणे.

चेहरा कसनुसा होणे -अपराधी भावना होणे.

नजर चुकवणे -डोळ्याला डोळा न देणे,शरम वाटणे.

पोटात खड्डा पडणे - भीती वाटणे.

पाय लटलटू लागणे -घाबरून पाय थरथरणे.

पोटात बकबुक होणे - खूप घाबरणे.

कबूल करणे - मान्य करणे.

जीव भांड्यात पडणे - दिलासा मिळणे.

चलबिचल होणे - जीवाची घालमेल होणे.

डोक्यावरून हात फिरवणे - माया करणे.

ठणकावून सांगणे - ठामपणे सांगणे.

ऐपत नसणे - कुवत नसणे.

ढसाढसा रडणे - खूप रडणे.

धूम ठोकणे - जोराने पळणे.

भरून येणे - गहिवरणे.

चकित करणे - आश्चर्य वाटायला लागणे.

पाठलाग करणे - पाठोपाठ जाणे.

 देहभान विसरणे - स्वतःची जाणीव विसरणे,गुंग होणे.

शोध घेणे - ओळखणे.

काळजी वाटणे - खंत वाटणे.

बाद करणे - आऊट करणे.

घामाघुम होणे -  खूप घाम येणे.

पाठ थोपटणे -  शाबासकी देणे.  

नावाचा जप चालणे - सारखी सारखी एखादी गोष्ट आठवणे.

धुडकावून लावणे - नकार देणे. 

मनावर ताबा मिळवणे - संयम बाळगणे.

गायब होणे -  नाहीसे होणे.

मन लालचावणे - एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे.

मन भरून येणे - भावना दाटून येणे.

पदर पसरणे - दुवा मागणे.

गायब होणे - अदृश्य होणे.

गौरव करणे - सन्मान करणे.

वावर असणे - हिंडणे-फिरणे.

खडानखडा माहिती असणे- संपूर्ण माहिती असणे.

संवर्धन करणे - काळजीपूर्वक वाढवणे.

झुंज देणे -  लढणे.

धाडस दाखवणे - हिम्मत दाखवणे.

मोलमजुरी करणे - कष्टाची कामे करून पैसे मिळवणे.

गाल फुगवणे - रुसून बसणे.

टिंगल करणे -  मस्करी करणे. खोडी करणे -चेष्टा करणे.

अर्ज करणे - विनंती करणे, विनवणी करणे.

छाती धडधडणे - जीव घाबरा घुबरा होणे.

गलबलून येणे - गहिवरणे,मन भरून येणे.

आग्रह करणे-  हट्ट धरणे.

खुशीत मान डोलावणे-  आनंदाने होकार देणे.

रस्ता पार करणे - रस्ता ओलांडणे.

डोळे टिपणे - अश्रू पुसणे.

कुतूहल वाटणे- उत्सुकता निर्माण होणे.

निरीक्षण करणे - नीट पाहणे.

अंगाला झोंबणे - अंगाला चुरचुरणे.

आधार देणे - आश्रय देणे, संरक्षण देणे.

फस्त करणे- सगळे खाऊन संपवणे.

रुंजी घालणे - गोल फेर धरणे.

फन्ना उडवणे - पदार्थ खाऊन लगेच संपवणे.

कानकीट्ट करणे - बोलून बोलून किंवा सततच्या एकाच आवाजाने कान किटवणे.

सुळकी मारणे - सूर मारणे, झेप घेणे.

निगा राखणे -  काळजी घेणे. 

मनमोहीत करणे - मन गुंग करणे.

पाळत ठेवणे - नीट लक्ष ठेवणे.

जोपासणे - निगा राखणे, काळजी घेणे.

कानोसा घेणे - कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे,अंदाज घेणे.

भरारी घेणे - झेप घेणे.

प्रसार होणे - पळून जाणे.

उधळून देणे - विखरून टाकणे.

रस घेणे - विशेष आवड असणे.

असंतोष निर्माण होणे - प्रचंड नाराजी निर्माण होणे,चीड येणे.

संकल्प करणे - दृढनिश्चय करणे.

जेरीस आणणे - हैराण करणे.

टिकव लागणे - निभाव लागणे, टिकणे.

बंड पुकारणे - विरोधात उठाव करणे.

रवानगी करणे - पाठवणे.

वीरगती प्राप्त होणे - वीरमरण येणे.

अमर होणे -  नाव चिरकाल राहणे.

उरात धडधडणे - भीती वाटणे.

मंडळ धरणे - फेर धरणे.

 







No comments:

Post a Comment