Thursday, August 22, 2024

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

 


 

 

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

 अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उत्तरणे.

अटकेपार झेंडा लावणे-फार मोठा पराक्रम गाजवणे.

अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे.

अडकित्त्यात सापडणे पेचात सापडणे.

अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.

अन्नास जागणे - उपकार स्मरणे.

अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे, उपासमार होणे.

अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे थोड्याश्या यशाने चढून जाणे.

आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे.

आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.

आकाशपाताळ एक करणे-  फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे.

आकाश फाटणे- चारी बाजूंनी संकटे येणे.

आकाशाला गवसणी घालणे-  आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

आगीत तेल ओतणे-  भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.

आच लागणे - झळ लागणे.

आपल्या पोळीवर तूप ओढणे - दुसऱ्याचा मुळीच विचार करता, साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.

आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे.

इकडचा डोंगर तिकडे करणे - फार मोठे अवघड कार्य पार पाडणे.

उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.

उखाळ्यापाखाळ्या काढणे - एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे.

उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.

उंटावरून शेळ्या हाकणे  - प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे.

उदक सोडणे - एखादया वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.

उद्ध्वस्त होणे - नाश पावणे.

उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे.

उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.

उराशी बाळगणे - मनात जतन करून ठेवणे.

उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.

उष्ट्या हाताने कावळा हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत करणे,

ऊत येणे - अतिरेक होणे.

एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.

अंगाची लाही लाही होणे - क्रोधाने क्षुब्ध होणे.

अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे.

गुजराण करणे - निर्वाह करणे.

गुण दाखवणे - (नकली स्वभाव टाकून) खरे स्वरूप प्रकट करणे.

गंगेत घोडे न्हाणे- कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे.

गळ्यात घोंड पडणे - इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.

गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे; एकदम पसार होणे.

गौडबंगाल असपणे - गूढ़ गोष्ट असणे, काहीतरी रहस्य असणे.

घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.

घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे.

घर धुऊन नेणे - सर्वस्वी लुबाडणे.

घाम गाळणे - खूप कष्ट करणे.

घालूनपाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.

घोडामैदान जवळ असणे - एखादया गोष्टीबाबत कसोटीची वेळ जवळ येणे.

घोडे मध्येच अडणे - प्रगतीत खंड पडणे.

घोडे मारणे - नुकसान करणे.

घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.

घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.

चतुर्भुज होणे - लग्न करणे; कैद होणे.

चव्हाट्यावर आणणे - उघडकीस आणणे; जाहीर करणे.

चंग बांधणे - निश्चय करणे.

चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे.

चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.

चौदावे रत्न दाखवणे - मार देणे.

जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे; कमालीचा प्रयत्न करणे.

जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे.

जिवात जीव येणे - (काळजी नाहीशी होऊन) पुन्हा धैर्य येणे.

जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे; हायसे वाटणे.

जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे.

जीव अधीर होणे - उतावीळ होणे.

जिवाची मुंबई करणे - खूप चैन करणे.

जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे..

जिवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे.

जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे.

जीव खाली पडणे - काळजीतून मुक्त होणे.

जिवाचा घडा करणे - पक्का निश्चय करणे.

जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.

जीव तिळतिळ तुटणे - एखादया गोष्टीसाठी तळमळणे,

जिवावर उठणे - (एखादयाचा) जीव घेण्यास उद्युक्त होणे.

दुसऱ्याच्या जिवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.

जिवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.

जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे.

जिवाला जीव देणे - एखादयासाठी प्राण देण्यास तयार असणे.

जीव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.

जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे.

 झळ लागणे - (एखादया गोष्टीचा) थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.

 टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे.

 टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.

 टाके ढिले होणे -  अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकद राहणे.

 टेंभा मिरवणे -दिमाख दाखवणे.

 डाव साधणे-  संधीचा फायदा घेऊन कार्य साधणे; योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळवणे.

 डाळ शिजणे - धारा मिळणे; सोय जुळणे; मनाजोगे काम होणे.

 डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे.

 डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.

 डोक्यावर खापर फोडणे - एखादयावर निष्कारण ठपका ठेवणे.

डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे.

डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.

डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देण्यास टाळणे.

डोळे निवणे - समाधान होणे.

डोळ्यांत खुपणे - सहन होणे.

डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे.

डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे.

डोळे दिपवणे - थक्क करून सोडणे.

डोळे पाणावणे - डोळ्यांत पाणी येणे.

डोळ्यांत प्राण आणणे -एखादया गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.

डोळे फाडून पाहणे -  तीक्ष्ण नजरेने पाहणे; आश्चर्यचकित होऊन पाहणे.

डोळे भरून पाहणे -समाधान होईपर्यंत पाहणे.

डोळ्यांत तेल घालून राहणे - अतिशय जागृत राहणे; दक्ष राहणे.

तडीस नेणे -  पूर्ण करणे.

ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे.

तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.

तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

तिलांजली देणे - सोडणे; त्याग करणे.

तोंड काळे करणे -दृष्टिआड होणे, नाहीसे होणे,

तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे - मिळालेल्या संधीचा लाभ उठवणे; दुसऱ्याच्या कष्टावर आपला

स्वार्थ साधणे.

तोंडाला पाने पुसणे - फसवणे.

तळहातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे.

तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे भयभीत होणे,

तोंडाला पाणी सुटणे - लोभ उत्पन्न होणे.

तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.

तोंड टाकणे - अद्वातद्वा बोलणे.

तोंडावाटे ब्र काढणे - एकही शब्द उच्चारणे.

थांग लागणे - कल्पना येणे.

थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.

थोबाड रंगवणे - तोंडात मारणे,

दगा देणे - फसवणे.

दबा धरून बसणे - टपून बसणे.

दाद देणे - थांगपत्ता लागू देणे; पूर्णपणे दुर्लक्ष करणे.

दाद मागणे - तक्रार करून किंवा गाऱ्हाणे सांगून न्याय मागणे.

दात धरणे - वैर बाळगणे; डूख ठेवणे.

दाढी धरणे - विनवणी करणे.

दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे.

दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे.

दत्त म्हणून उभे राहणे - एकाएकी हजर होणे.

दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे.

द्राविडी प्राणायाम करणे - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.

दुधात साखर पडणे - अधिक चांगले घडणे.

दातओठ खाणे - द्वेषाची भावना दाखवणे.

दोन हातांचे चार हात होणे - विवाह होणे.

दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे - दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.

दातास दात लावून बसणे - काही खाता उपाशी राहणे.

दुःखावर डागण्या देणे - दुःख झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे.

धारातीर्थी पडणे - रणांगणावर मृत्यू येणे.

धरणे धरणे - हट्ट धरून बसणे.

धाबे दणाणणे - खूप घाबरणे.

धूम ठोकणे - वेगाने पळून जाणे.

धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.

नजरेत भरणे - उठून दिसणे,

नजर करणे - भेटवस्तू देणे.

नाक घासणे - स्वतःचे कार्य साधण्यासाठी दुसऱ्याचे पाय धरणे.

नाक ठेचणे - नक्षा उतरणे.

नाक मुरडणे - नापसंती दाखवणे.

नाकावर राग असणे - लवकर चिडणे.

नाक वर असणे - ऐट, दिमाख किंवा ताठा असणे.

पाढा वाचणे - सविस्तर हकिकत सांगणे.

पाठ सोडणे - एखादया गोष्टीचा पिच्छा पुरवणे.

नाकाला मिरच्या झोंबणे - एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे.

नाकीनऊ येणे - मेटाकुटीला येणे; फार त्रास होणे.

नांगी टाकणे - हातपाय गाळणे.

नाकाने कांदे सोलणे - स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे.

नक्राश्रू ढाळणे - अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे.

नक्षा उतरवणे - गर्व उतरवणे.

नाकाशी सूत धरणे - आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे.

पाठीशी घालणे - संरक्षण देणे.

पाणी दाखवणे - सामर्थ्य दाखवणे.

पाणी पडणे - वाया जाणे.

पाणी मुरणे - कपटाने काहीतरी लपवून ठेवणे; गुप्त कट शिजत असणे.

पाणी पाजणे - पराभव करणे.

पाणी सोडणे - आशा सोडणे; त्याग करणे.

पदरात घेणे - स्वीकारणे.

पदरात घालणे - चूक पटवून देणे; स्वाधीन करणे.

पाचवीला पुजणे - त्रासदायक गोष्टीची कायमची सोबत असणे.

पादाक्रांत करणे - जिंकणे.

पार पाडणे - पूर्ण करणे.

पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे.

पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने जाणे.

पराचा कावळा करणे - मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे.

पायाखाली घालणे - पादाक्रांत करणे.

पुंडाई करणे - दांडगाईने वागणे.

पाठ दाखवणे - पळून जाणे.

पायमल्ली करणे - उपमर्द करणे.

पोटात कावळे कावकाव करणे - अतिशय भूक लागणे; भुकेने जीव व्याकूळ होणे.

पोटात घालणे - क्षमा करणे.

पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे.

पोटावर पाय देणे - उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे.

पोटाची दामटी वळणे - खायला मिळणे.

पदरमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे.

पोटाला चिमटा घेणे - पोटाला खाता राहणे.

पोटात ब्रह्मराक्षस उठणे - खूप खावेसे वाटणे.

प्रश्नांची सरबत्ती करणे - एकसारखे प्रश्न विचारणे.

प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा करणे.

प्राण कानांत गोळा होणे - ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे.

फाटे फोडणे-उगाच अडचणी निर्माण करणे , एखादे काम टाळण्यासाठी हरकती काढणे.

फुटाण्यासारखे उडणे - रागाने एकदम एखादया कार्यास प्रवृत्त होणे.

बट्ट्याबोळ होणे - विचका होणे.

बना करणे - बोभाटा करणे; सगळींकडे प्रसिद्धी करणे.

बारा वाजणे - पूर्ण नाश होणे.

बादरायण संबंध असणे - ओढूनताणून लावलेला संबंध असणे.

बत्तिशी रंगवणे - जोराने थोबाडात मारणे.

बत्तिशी दाखवणे - हसणे.

बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे.

बेत हाणून पाडणे - बेत सिद्धीला जाऊ देणे.

बोचणी लागणे - एखादी गोष्ट मनाला लागून राहणे.

बोटावर नाचवणे - आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.

बोल लावणे - दोष देणे.

बोळ्याने दूध पिणे- बुद्धिहीन असणे.

बोलाफुलाला गाठ पडणे - दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे.

भगीरथ प्रयत्न करणे - चिकाटीने प्रयत्न करणे.

भान नसणे - जाणीव नसणे.

भारून टाकणे - पूर्णपणे मोहून टाकणे.

मनात मांडे खाणे - व्यर्थ मनोराज्य करणे.

मान ताठ ठेवणे - स्वाभिमानाने वागणे.

माझ्या मारणे - कोणताही उदयोग करणे.

मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे.

मधून विस्तव जाणे - अतिशय वैर असणे,

मूग गिळणे - उत्तर देता गप्प राहणे.

मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे.

मनात घर करणे - मनात कायमचे राहणे.

मन मोकळे करणे - सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखवणे.

मनाने घेणे - मनात पक्का विचार येणे.

मन साशंक होणे - मनात संशय वाटू लागणे,

मनावर ठसणे - मनावर जोरदारपणे बिंबणे.

मशागत करणे - मेहनत करून निगा राखणे,

मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे.

रक्ताचे पाणी करणे - अतिशय मेहनत करणे,

राईचा पर्वत करणे - क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे.

राख होणे - पूर्णपणे नष्ट होणे.

राब राब राबणे - सतत खूप मेहनत करणे.

राम नसणे - अर्थ नसणे.

राम म्हणणे - शेवट होणे; मृत्यू येणे.

ष्कराच्या भाकऱ्या भाजणे- दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे.

लहान तोंडी मोठा घास घेणे - आपणांस शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे.

लक्ष वेधून घेणे - लक्ष ओढून घेणे.

लक्ष्मीचा वरदहस्त असणे - लक्ष्मीची कृपा असणे; श्रीमंती असणे.

लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे.

वकीलपत्र घेणे - एखादयाची बाजू घेणे.

वाट लावणे - विल्हेवाट लावणे; मोडूनतोडून टाकणे.

वाटाण्याच्या अक्षता लावणे - स्पष्टपणे नाकारणे.

वठणीवर आणणे - ताळ्यावर आणणे; नम्र व्हायला लावणे.

वणवण भटकणे - एखादी गोष्ट मिळण्यासाठी खूप फिरणे.

वाचा बसणे - एक शब्दही बोलता येणे.

विचलित होणे - मनाची चलबिचल होणे.

विसंवाद असणे - एकमेकांशी जमणे.

वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकाचा राग दुसऱ्यावर काढणे.

विडा उचलणे - निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.

वेड घेऊन पेडगावला जाणे - मुद्दाम ढोंग करणे.

शब्द जमिनीवर पडू देणे - दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.

शहानिशा करणे - एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.

शिगेला पोहोचणे - शेवटच्या टोकाला जाणे.

शंभर वर्षे भरणे - नाश होण्याची वेळ जवळ येणे.

श्रीगणेशा करणे - आरंभ करणे.

सहीसलामत सुटणे - दोष येता सुटका होणे.

सळो की पळो करणे -अतिशय हैराण करणे.

सर्वस्व पणाला लावणे -सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

साखर पेरणी - गोड गोड बोलून आपलेसे करणे.

सामोरे जाणे - निधड्या छातीने (संकटास) तोंड देणे.

साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे.

साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे; खरेखुरे स्वरूप कळणे.

सुताने स्वर्गाला जाणे - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे

सूतोवाच करपणे - पुढे घडणाऱ्या गोष्टीची प्रस्तावना करणे; प्रारंभ करणे.

सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.

संधान बांधणे - जवळीक निर्माण करणे,

संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे.

स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत येणे.

स्वर्ग दोन बोटे उरपणे - आनंदाने, गवनि अतिशय फुगून जाणे.

हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट सोडणे.

हमरीतुमरीवर येणे - जोराने भांडू लागणे.

हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे,

हसता हसता पुरेवाट होणे - अनावर हसू येणे.

हस्तगत करणे - ताब्यात घेणे.

हातपाय गळणे - धीर सुटणे.

हातचा मळ असणे - सहज शक्य असणे.

हात ओला होणे - फायदा होणे.

हात टेकणे - नाइलाज झाल्याने माघार घेणे.

हात देणे - मदत करणे.

हात मारणे - ताव मारणे; भरपूर खाणे.

हात दाखवणे - बडवून काढून वा अन्य प्रकारे आपले सामर्थ्य दाखवणे; इंगा दाखवणे.

हाय खाणे - धास्ती घेणे.

हात चोळणे - चरफडणे.

हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.

हात हालवत परत येणे - काम होता परत येणे.

हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे

हातापाया पडणे - गयावया करणे.

हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे.

हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत घेता फुकटचे श्रेय घेणे.

हातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा करणे.

हात धुऊन पाठीस लागणे - चिकाटीने एखादया गोष्टीच्या मागे लागणे.

हूल देणे - चकवणे.

अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे.

अंथरूण पाहून पाय पसरणे - ऐपतीनुसार खर्च करणे.

कणीक तिंबणे -  खूप मार देणे.

कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.

कपाळमोक्ष होणे - मरण पावणे.

कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे.

कानावर पडणे - सहजगत्या माहीत होणे.

कानांवर हात ठेवणे - माहीत नसल्याचा बहाणा करणे.

कानउघाडणी करणे - कडक शब्दांत चूक दाखवून देणे.

काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.

कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.

कान टवकारून ऐकणे - अगदी लक्षपूर्वक ऐकणे.

कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे.

काट्याने काटा काढणे - एका शत्रूच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे.

काट्याचा नायटा होणे - क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

कावराबावरा होणे - बावरणे.

काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे.

कुत्रा हाल खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.

कंठस्नान घालणे - ठार मारणे.

कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे; उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

कंबर कसणे - एखादया गोष्टीसाठी हिंमत करून तयार होणे.

कुंपणाने शेत खाणे - ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखादयाचा घात करणे.

कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.

कोपरापासून हात जोडणे - काहीही संबंध राखण्याची इच्छा प्रकट करणे.

खडा टाकून पाहणे - अंदाज घेणे.

खडे चारणे- शरण येण्यास भाग पाडणे.

खापर फोडणे - एखादयावर निष्कारण ठपका ठेवणे.

खाजवून खरूज काढणे - मुद्दाम भांडण उकरून काढणे.

खाल्ल्या घरचे वासे मोजणे - उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे.

खूणगाठ बांधणे - पक्के ध्यानात ठेवणे.

खो घालणे - विघ्न निर्माण करणे.

गर्भगळित होणे - अतिशय घाबरणे.

गळ घालणे - अतिशय आग्रह करणे.

गळ्यात पडणे - एखादयाला खूपच भीड घालणे,

गळ्याशी येणे -नुकसानीबाबत अतिरेक होणे.

गाडी पुन्हा रुळावर येणे -चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.

No comments:

Post a Comment