Tuesday, September 3, 2024

आरती संग्रह ( सर्व देवतांची आरती )




।। श्री गणपतीची आरती ।।


सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची

सर्वांगी सुंदर उटी शेंदूराची

कंठी झळके माळ मुक्ताफळांची

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव ।।धृ ।।

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरेजडित मुकुट शोभतो बरा

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया

जयदेव जयदेव जयमंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव ॥२॥

लंबोदर पितांबर फणिवरवंदना

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनकामना पुरती जयदेव जयदेव ।।३ ।।

----------------------------------------



।। आरती श्री देवीची ।।


दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी

अनाथनाथे अंबे करूणा विस्तारी

वारी वारी जन्म मरणांते वारी

हारी पडलो आता संकट निवारी ।।१।।

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।। धृ ।।

त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही

चारी श्रमले परंतु न बोलवे काही

साही विवाद करिता पडलो प्रवाही

ते तु भक्तालागी पावसी लवलाही ।। जय देवी ॥ २॥

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा

क्लेशापासूनी सोडवी तोडी भवपाशा

अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा

नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ।। जय देवी ।।३।।

----------------------------------------



।। आरती शंकराची।।


लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा

विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा

लावण्यसुंदर मस्तकी वाळा

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।।१।।

जय देव जय देव श्री शंकरा

आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ।। धृ ।।

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा

विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव ।। २ ।।

देवी दैत्यी सागर मंथन पै केले

त्यामाजी अवचित हलाहल जे उठिले

ते त्वां असुरपणे प्राशन केले

नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ।। जय देव ।। ३ ।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी

शतकोटीचे बीज वाचे उच्चारी

रघुकुळतिलक राम दासा अंतरी ।। जय देव ।। ४ ।।

----------------------------------------




 ।। श्री विठ्ठलाची आरती ।।


युगे अठ्ठावीस विटेवरी उभा

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा

पुंडलिकाचे भेटी परबह्म आले गा

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।।१ ।।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।

रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।। धृ ।।

तुळसीमाळा गळा कर ठेवूनी कटी

कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी

देव सुरवर नित्य येती भेटी

गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ।। जय देव ।।२।।

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा

राई रखुमाई राणीया सकळा

ओवाळीती राजा विठोबा सावळा ।। जय देव ।।३ ।।

ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती

दिंड्या पताका वैष्णव नाचती

पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। जय देव ।।४ ।।

आषाढी कार्तिकी भक्तजन येती

चंद्रभागेमध्ये स्नाने जे करिती

दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती

केशवासी नामदेव भावे ओवाळीती ।। जय देव ।।५ ।।

----------------------------------------



।। श्री दत्ताची आरती ।।


त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा

नेती नेती शब्द नये अनुमाना

सुरवर मुनिजन योगी समाधी न ले ध्याना ।।१ ।।

जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता

आरती ओवाळीता हरली भवचिंता ।।धृ ।।

सबाह्य अभ्यंकरी तू एक दत्त

अभ्याग्यासी कैसी न कळे ही मात

पराही परतली तेथे कैचा हा हेत

जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। जय ।।२ ।।

दत्त येऊनिया उभा ठाकला

सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला

जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। जय ।।३ ।।

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान

हरपले मन झाले उन्मन

मीतुपणाची झाली बोळवण

एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। जयदेव ।।४ ।।

----------------------------------------



।।श्री ज्ञानदेवाची आरती ।।


आरती ज्ञानराजा

महाकैवल्यतेजा

सेविती साधुसंत

मनु वेधला माझा ।। आरती ।।धृ. ।।

लोपले ज्ञान जगी

हित नेणती कोणी

अवतार पांडुरंग

नाम ठेविले ज्ञानी ।। आरती ।।१ ।।

कनकाचे ताट करी

उभ्या गोपिका नारी

नारद तुंबरही

साम गायन करी ।। आरती ।।२ ।।

प्रगट गुह्य बोले

विश्व ब्रह्मचि केले

रामा जनार्दनी

पायी मस्तक ठेविले ।। आरती ।।३ ।।

----------------------------------------

।। प्रार्थना ।।


(आरतीनंतर म्हणावी)


घालीन लोटांगण, वंदिन चरण

डोळ्यांनी पाहीन रूप तुझे

प्रेमे आलिंगन आनंदे पुजीन

भावे ओवाळीन म्हणे नामा ।।१ ।।


त्वमेव माता च पिता त्वमेव

त्वमेव बंधूच सखा त्वमेव

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव

त्वमेव सर्व मम देवदेव ।।२ ।।


कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा,

बुद्ध्यात्मना वा प्रकृतीस्वभावात

करोमि यद्यत्म सकलं परस्मै,

नारायणायेति समर्पयामि ।।३ ।।


अच्युतं केशवं रामनारायणं,

कृष्णा दामोदरं वासुदेवं हरि

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं

जानकीनायकं रामचंद्रं भजे ।।४ ।।

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे

हरे कृष्ण, हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

----------------------------------------



।। श्री जोतिबाची आरती ।।


भागिरथी मूळशीतल हिमाचलवासी ।

न लगत पल खल-दुर्जन संहारी त्यासी ।

तो हा हिम-केदार करवीरापाशी ।

रत्नागिरीवर शोभे कैवल्यराशी ।।१ ।।

जयदेव जयदेव जय जय केदारा ।

दासा संकटी तारा भवभय निवारा ।।धृ ।।


उत्तरेचा देव दक्षिणी आला ।

दक्षिण-केदार नामे पावला ।

रत्नासुर मर्दीन भक्ता पावला ।

दास म्हणे थोर भाग्ये लाभला ।।२ ।।

जयदेव जयदेव जय जय केदारा ।

दासा संकटी तारा भवभय निवारा ।।


जोतिबाच्या नावानं चांगभलं ।


























No comments:

Post a Comment